शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

‘सारी’चा उद्रेक, यंदा ३८८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

अमरावती : कोरोना ब्लास्टमध्ये कोरोनासारखीच लक्षणे असणाऱ्या ‘सारी’ (सिव्हीअर अक्यूट रेस्पीरेटरी इलनेस) या आजाराचेही रोज सरासरी ६ ते ७ ...

अमरावती : कोरोना ब्लास्टमध्ये कोरोनासारखीच लक्षणे असणाऱ्या ‘सारी’ (सिव्हीअर अक्यूट रेस्पीरेटरी इलनेस) या आजाराचेही रोज सरासरी ६ ते ७ रुग्णांची नोंद होत आहे. यंदा जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये ३८८ रुग्णांची नोंद व तिघांचा मृत्यू झालेला आहे. वर्षभरात २६०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये २५५ रुग्णांचे बळी गेल्याने कोरोना संसर्ग काळात जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

सर्दी, ताप, खोकला, श्वसनास त्रास आदी कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे सुरुवातीच्या काळात ते अगदी ऑक्टोबरपर्यंत या आजाराकडे आरोग्य यंत्रणेद्वारा लक्ष देण्यात आले व त्यानंतर मात्र, फारसे गांभीर्याने घेण्यात आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता तर खासगी रुग्णालयात सारीच्या रुग्णाला कोरोनाचा रुग्ण समजून उपचार केले जात असल्याची उदाहरणे आहेत.

या आजारासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाच्या विशेष सूचना असतानाही दुर्लक्षित केले जात आहे. सध्या पीडीएमसी व जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘सारी’च्या आजारासंदर्भात विशेष कक्ष आहे. ग्रामीणमध्ये मात्र ओपीडीमध्येच उपचार केले जात आहेत. यंदा जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढता असताना ३८८ रुग्णांची नोंद झाली व विशेष म्हणजे या रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १४४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद झालेली आहे. वर्षभरात तर ६००पेक्षा अधिक ‘सारी’चे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत.

जिल्ह्यात जानेवारीच्या सुरुवातीपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कालावधीत १५ हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. त्यामध्ये ‘सारी’चा शिरकाव धोकादायक मानला जात आहे.

बॉक्स

‘सारी’च्या रुग्णांवर कोरोनाचे उपचार नकोत

कोरोनासारखीच लक्षणेच असल्यामुळे ‘सारी’चे काही रुग्णांना कोरोनाचा रुग्ण समजून त्यांच्यावर उपचार केले गेल्याची उदाहरणे आहेत. यासाठी ‘एचआरसीटी’स्कॅनचा आधार घेतला गेला. मात्र, कोरोनाचा रुग्ण आरटीपीसीआर चाचणीद्वारेच निष्पन्न होत असतांना चाचणीची वाट न पाहता अशा रुग्णांवर उपचार झालेले आहेत. ‘सारी’च्या रुग्णांना ‘रेमेडेसिवर’ इंजेक्शन देऊ नये, असे डीएचओ डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

बॉक्स

‘सारी’चे ३७.११ टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात ‘सारी’च्या ३८८ रुग्णांची नोंद झाली. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली असतांना १४४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. हे प्रमाण ३७.११ टक्के आहे. एप्रिल ते डिसेंबर या काळात ४३५ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये २६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोग्य यंत्रणेचा अहवाल आहे.

कोट

उपचारासाठी रुग्ण लवकर आल्यास ‘सारी’ हा निश्चित बरा होणारा आजार आहे. अलिकडे या आजाराच्या रुग्णसंख्येत घट झालेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजारासाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा आहे.

डॉ. श्यामसुंदर निकम

जिल्हा शल्य चिकीत्सक