शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाची खुलेआम विक्री

By admin | Updated: January 15, 2017 00:06 IST

सर्वीच्च न्यायालयाने नायलॉनच्या मांजा विक्रीवर निर्बंध घातले आहे. तरही शहरात खुलेआम या मांजाची विक्री होतांना निदर्शनास आले आहे .

लहानग्यांचा जीव धोक्यात : बंदी असतानाही वापर कसा ?संदीप मानकर अमरावतीसर्वीच्च न्यायालयाने नायलॉनच्या मांजा विक्रीवर निर्बंध घातले आहे. तरही शहरात खुलेआम या मांजाची विक्री होतांना निदर्शनास आले आहे .यामुळे लहान मुलांचा जीव धोक्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवमानना होत असेल तर पोलीसांनी कारवार्इंचा बडगा का उगारु नये,असा प्रश्न विचारला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने नायलॉनच्या घातक मांजा उत्पादन व विक्रीवर निर्बध घातले आहेत. अलीकडे या घातक मांजाने लहान मुलांचा गळा चिरल्याच्या घटना उघड झाल्यात. परंतु अंबानगरीत मकरसंक्रातीनिमित्त अनेक हौसी तरुणांना पतंग उडविण्याचा मोह आवरत नाही. नमुना, खापर्डे बगीचा ,जवाहर गेट, गांधी चौक, ईतवारा व शहरातील अनेक पतंग विक्रेत्यांक डे नायलॉनचा मांजा विक्रीस उपलब्ध आहे. २० ते ८० रुपयांमध्ये हा मांजा मिळतो. लहान मुलेही पतंग उडवितात. एखादी पतंग कटली की, तिच्या मागे मुले धावतात. हा धागा अत्यंत धारदार असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नॉयलान मांज्यामुळे अनेकांचे हात कापल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही राजरोसपणे हा मांजा वापरल्या जातो.पोलिसांनी कारवाई करावी नायलॉन मांजा विक्र ीवर न्यायालयाने निर्बंध घातले असतानाही शहरात मांजा विक्री करण्याच्या गोरखधंदा फोफावला आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीसांनी अशा दुकानांवर धाडी टाकून कारवाई करणे अपेक्षित आहे. थोडासा नफा मिळविण्यासाठी पतंग व मांजा विक्रेते हा व्यवसाय करतात. मात्र त्यांच्या नफेखोरीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.पोलिसांनी कारवाई करणे अभिप्रेत आहे.प्रशांतनगरमध्ये मुलांजवळ आढळला मांजा मकरसंक्रातीला पतंगोत्सवाला उधान येते. काही वर्षापुर्वीसाधा मांजा विक्रीस होता.मात्र आता चायनामेड नायलॉन मांजा प्राधान्याने विकला जातो.शनिवारी प्रशांतनगर परिसरात एका लहान मुलाकडे नायलॉनचा मांजा आढळून आला. त्याला विचारणा केली असता, तो मांजा नमुना गल्लीतून विकत आणल्याचे त्याने सांगितले. पतंग विक्रेत्यांचे शहरात व जिल्हयात शेकडो दुकाने आहेत.