शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
3
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
4
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
5
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
6
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
7
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
8
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
9
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
10
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
11
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
12
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
13
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
14
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
15
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
16
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
17
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
18
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
19
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
20
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५० रूग्णांमागे एकच परिचारिका

By admin | Updated: May 11, 2014 22:48 IST

रूग्णांची अहोरात्र सेवा करून त्यांना जीवदान देणार्‍या जिल्ह्याभरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात परिचारिकांचे कार्य कौतुकास्पद आहे.

अमरावती : रूग्णांची अहोरात्र सेवा करून त्यांना जीवदान देणार्‍या जिल्ह्याभरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात परिचारिकांचे कार्य कौतुकास्पद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयात १९५ परिचारीका आरोग्य सेवा पुरवित आहेत. ५० रूग्णांमागे १ परिचारिका सध्या कार्यरत असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. सोमवार १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा. जागतिक परिचारिका दिनाला १९६५ सालापासून सुरूवात करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा इंटरनॅशनल काऊंसिल आॅफ नर्स युनायटेड स्टेट यांनी हा दिन साजरा केला होता. त्यांनतर दरवर्षी एक नवीन उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे प्रयत्न जागतिक परिचारिका संघटना व जागतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने केले जाते. आरोग्य सेवेतील बदलांचा एक प्रभावी घटक म्हणून परिचारीकांकडे बघितले जाते. परिचारिका रुग्णालयांमध्ये रूग्णांची फक्त सेवाच करीत नाहीत तर ही सेवा देताना येणार्‍या अडचणी व सकंटांवर कष्टाने मात करतात. रूग्णांना आरोग्य सेवा पुरविताना कुठलीही हयगय होणार नाही, याची काळजी परिचारिका सातत्याने घेतात. त्यामुळे डॉक्टरांनंतर परिचारिकांचे कार्यच महत्त्वाचे ठरते. आरोग्य सेवेच्या कार्यात हातभार लावणार्‍या कर्मचार्‍यांकडे लक्ष पुरविण्यासोबतच आरोग्य सेवेबाबत संपूर्ण माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य परिचारिकाच करतात. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, टीबी हॉस्पिटल व उपजिल्हा रुग्णालयांत परिचारीका आपले कार्य मनोभावे करताना आढळतात. विविध शासकीय रुग्णालयांमध्ये शेकडो रुग्ण उपचार घेतात. रुग्णांची वाढती संख्या पाहता ५०० रुग्णांची आवश्यकता जिल्ह्यातील रुग्णालयाना भासत आहे.त्याकरीता शासनाकडे प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे.