शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: मुंबईत पावाच्या लादीत ५ रुपयांची वाढ, पेट्रोल-डिझेलही महागले
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
6
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
7
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
8
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
9
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
10
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
11
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
12
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
13
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
14
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
15
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
16
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
17
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
18
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
19
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
20
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
Daily Top 2Weekly Top 5

जनजाती सल्लागार परिषदेच्या १५ वर्षांत केवळ ६ बैठका; राज्य शासनाला वेळ मिळेना?

By गणेश वासनिक | Updated: March 21, 2026 17:08 IST

Amravati : आदिवासी आमदारांनी राज्यपालांची घेतली भेट; समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी घातले साकडे

अमरावती : भारतीय राज्यघटनेच्या ५ व्या अनुसूचीनुसार जनजाती सल्लागार परिषदेच्या वर्षातून किमान दोन बैठका होणे अनिवार्य आहे. परंतु, गत १५ वर्षांत राज्य सरकारने केवळ सहाच बैठका घेतल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी स्थापित जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकांसाठी राज्य शासनाकडे वेळच नाही, असे म्हणण्याचा प्रसंग आला आहे.

भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचीतील भाग-ख मधील परिच्छेद ४ (१) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातील विचारलेल्या विषयांच्या बाबतीत राज्यपालांना सल्ला देण्याकरिता जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे. १ जानेवारी २०१० ते ४ डिसेंबर २०२४ पर्यंत जनजाती सल्लागार परिषदेच्या केवळ सहाच बैठका झालेल्या आहेत. त्यानंतर ५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीचे सरकार सत्तेत आले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याही आजपर्यंतच्या सव्वा वर्षाच्या कालावधीत एकही बैठक झालेली नाही.

"राष्ट्रीय जनजाती आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. रामेश्वर उराव यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना १८ जून २०१२ रोजी अहवाल सादर केला. त्या अहवाल सूचना केल्यानुसार वर्षातून किमान दोन बैठका झाल्या पाहिजेत. मात्र, १५ वर्षांत केवळ ६ बैठका झाल्यात. त्या ३० व्हायला पाहिजे होत्या. समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी बैठकांचा आग्रह धरीत नसल्यामुळे बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत."
- ॲड. प्रमोद घोडाम, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम

आमदारांनीही घेतली राज्यपालाची भेट

आदिवासी समाजाच्या २२ आमदारांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची १३ मार्च रोजी भेट घेऊन जनजाती सल्लागार परिषदेची बैठक आयोजित करणे, आरक्षित पदे भरण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा, जातपडताळणीच्या कार्यपद्धतीत सुधारणा १२,५०० रिक्त पदांची विशेष भरती प्रक्रिया आदी समस्या मांडल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tribal Advisory Council: Only 6 meetings in 15 years!

Web Summary : Maharashtra's Tribal Advisory Council, vital for tribal welfare, has met just six times in fifteen years, despite a mandate for biannual meetings. This raises concerns about government attention to tribal issues, highlighted by pending problems.
टॅग्स :Amravatiअमरावती