शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

२०० दिवसांमध्ये उकळली एक कोटींची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST

कॉमन प्रदीप भाकरे अमरावती : यंदा जानेवारी ते १९ जुलै या २०० दिवसांच्या कालावधीत राज्यातील ६०० लाचखोरांनी तब्बल १ ...

कॉमन

प्रदीप भाकरे

अमरावती : यंदा जानेवारी ते १९ जुलै या २०० दिवसांच्या कालावधीत राज्यातील ६०० लाचखोरांनी तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच उकळली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कालावधीत ४३५ ट्रॅप यशस्वी केले. गतवर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सहामाहीत ट्रॅपपध्ये तब्बल ३१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

यावर्षी झालेल्या ४३५ ट्रॅपमध्ये ६०० जणांना अटक करण्यात आली, तर गतवर्षी याच कालावधीत ३३१ ट्रॅपमध्ये ४६२ आरोपी होते. यंदा त्यात १०४ वाढीव ट्रॅपची भर पडली. म्हणजेच कोरोनाकाळातही लाचखोर सुसाट सुटल्याचे संतापजनक चित्र आहे. यंदाच्या पहिल्या २०० दिवसांत एसीबीने जे ४३५ ट्रॅप यशस्वी केले, त्यात ६०० लाचखोरांना अटक करण्यात आली. यात वर्ग १ चे ४०, वर्ग २ चे ५६, वर्ग ३ चे ३४४, वर्ग ४ चे २९, ६३ खासगी लोक व ६८ खासगी व्यक्तींचा समावेश आहे. या ६०० जणांना तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच घेताना वा मागणी सिद्ध झाल्याने अटक करण्यात आली. यात वर्ग १ च्या लाचखोरांनी २८ लाख ४९ हजार लाच उकळली. वर्ग २ च्या अधिकाऱ्यांनी १५ लाख ८५ हजार २०० रुपये, वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांनी ५३ लाख ९१ हजार ७५० रुये, वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांनी ४ लाख ४ हजार, अन्य लोकसेवकांनी ३ लाख २६ हजार ९०० रुपये, तर खासगी व्यक्तींनी ४ लाख १२ हजार ८०० रुपये लाच म्हणून घेतल्याची नोंद एसीबीने घेतली आहे.

बॉक्स

मार्चमध्ये सर्वाधिक ट्रॅप

यंदाच्या जानेवारीत एसीबीने ६२ ट्रॅप यशस्वी करीत ८७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. फेब्रुवारीत ६६ ट्रॅपमध्ये ८५, मार्चमध्ये ८८ ट्रॅपमध्ये ११९, एप्रिलमध्ये ४९ ट्रॅपमध्ये ६६, मेमध्ये ४७ मध्ये ७४, जूनमध्ये ७७ सापळ्यात १०३ तर, जुलैच्या १९ तारखेपर्यंत ४६ ट्रॅपमध्ये ६६ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे.