शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांसाठी एनआरएचएम वेठीस

By admin | Updated: May 28, 2016 00:01 IST

आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेंंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापकांच्या ....

पदवीधर नोंदणी : युवक काँग्रेसकडून प्रकार उघडअमरावती : आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेंंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयातून मतदार नोंदणी सुरू असल्याचा प्रकार शुक्रवारी उघड झाला. राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे पदवीधर मतदारसंघासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. युवक काँग्रेसचे भय्या पवार, राहुल येवले, आदित्य पेलागडे, सागर देशमुख, गुड्डू धर्माळे व अन्य पदाधिकारी कामानिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयात २७ मे रोजी दुपारी गेले. तेथे त्यांना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकांच्या टेबलवर पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अर्जांचे वाटप केले जात असल्याचा प्रकार आढळून आला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची यादीदेखील मतदार नोंदणीसाठी याठिकाणी आढळली. रणजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मतदार नोंदणीचा भंडाफोडअमरावती : त्यामुळे युवक काँग्रेसने यावर आक्षेप घेत उपस्थित कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली. मात्र, संबंधितांनी याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. ही सर्व प्रक्रिया शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग करीत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या माध्यमातून केली जात असल्याचा आरोप युवक काँग्रेचे राष्ट्रीय सरचिटणीस भय्या पवार यांनी केला आहे. हा खळबळजनक प्रकार उघडकीस येताच याची माहिती युकाँच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून दिली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या कार्यालयातून पदविधर मतदार नोंदणीचे जवळपास दीड हजार अर्ज दिसून आलेत. यासंदर्भात गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.