शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

-आता राजकीय परीक्षा

By admin | Updated: September 25, 2014 23:15 IST

काँग्रेस - राष्ट्रवादीची १५ वर्षांपूर्वीपासून असलेली आघाडी तर भाजप-सेनेची २५ वर्षांपूर्वींची युती गुरुवारी दुभंगली. या नव्या राजकीय समीकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार आहे.

ताटातूट : भाजप, सेना; काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार आमने-सामनेअमरावती : काँग्रेस - राष्ट्रवादीची १५ वर्षांपूर्वीपासून असलेली आघाडी तर भाजप-सेनेची २५ वर्षांपूर्वींची युती गुरुवारी दुभंगली. या नव्या राजकीय समीकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार आहे. स्वबळावर विधानसभा निवडणूक सर करण्यासाठी आठही मतदारसंघांत सक्षम उमेदवार असल्याचा दावा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेनेच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून आघाडी, महायुतीत जागावाटप, मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरुन घमासान सुरू होते. चर्चा, बैठकांचे सत्र सुरू असताना कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर गुरुवारी भाजपने युती तर राष्ट्रवादीने आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला. युती तुटल्याचा परिणाम जिल्ह्यात भाजप, सेनेच्या उमेदवारांवर होणार आहे. १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेपुढे जाताना आता कस लागणार आहे. चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार असल्याने कोणाची किती राजकीय शक्ती वाढली, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. काही दिवसांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र आटोपले. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी आठही मतदारसंघांत उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी करतील, अशी माहिती आहे. जागा वाटपाचे गुऱ्हाळ संपत नसल्याने भाजप, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीसुद्धा आठही मतदारसंघांत सक्षम उमेदवारांची चाचपणी करुन त्यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविली आहे. युती तुटणार, अशी कुणकुण शिवसेनेच्या नेत्यांना होती. त्यानुसार आठही मतदारसंघांत उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र आटोपले आहे.