शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘स्थायी’ सभापती निवडणुकीची मोर्चेबांधणी

By admin | Updated: February 22, 2015 00:07 IST

महापालिकेत शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीत नव्या सभापतीपदाची निवडणूक ६ मार्चपूर्वी राबविणे आवश्यक आहे.

अमरावती : महापालिकेत शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीत नव्या सभापतीपदाची निवडणूक ६ मार्चपूर्वी राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रशासनाने ही निवडणूक ४ मार्चपूर्वी घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याशी पत्रव्यवहार सुरु केला आहे.विद्यमान स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांच्यासह सहा सदस्यांना नैसर्गिक प्रक्रियेनुसार ६ मार्च रोजी निवृत्त व्हावे लागणार आहे. त्यामुळे नवीन सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही ६ मार्च पूर्वी आटोपणे आवश्यक आहे. हल्ली स्थायी समितीत काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना २, भाजप २, बसप १, जनविकास- रिपाइं २ अशी सदस्य संख्या आहे. या संख्याबळावर काँग्रेसचे विलास इंगोले सहजतेने निवडून येतील, असे संकेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या करारानुसार स्थायी समिती सभापतीपद हे काँग्रेसच्या वाट्याला असून ९ सदस्य संख्याबळाच्या भरवशावर इंगोले हे सभापतीपदी निवडून येतील, असे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतापदी अविनाश मार्डीकर हे सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने संजय खोडके गटाला राजकीय बळ मिळाले आहे. इंगोले यांच्या नावाला सभापती म्हणून हल्ली कोणाचाही विरोध नाही. महापालिका स्थापनेपासून ज्येष्ठ सदस्य असलेले विलास इंगोले यांना स्थायी समितीच्या सभापतीपदी विराजमान करण्यासाठी माजी आ. रावसाहेब शेखावत हे आग्रही असल्याचे बोलले जाते. त्यानुसार काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत विलास इंगोले यांची निवड अविरोध कशी होईल, यासाठी बबलू शेखावत यांनी पडद्यामागील राजकारण सुरु केले आहे. दरम्यान ही निवडणूक प्रक्रिया कधी राबविणार, याबाबत नगरसचिव मदन तांबकेर यांना विचारणा केली असता रंगपंचमीपूर्वीच ही निवडणूक घ्यावी, असे पत्र जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सोमवारी पाठविले जाईल, असे तांबेकर म्हणाले. स्थायी समितिच्या निवडणुकी निमित्ताने सध्या महापालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. आता फक्त केवळ स्थायी समिति सभापती पदाच्या निवडणुकीच्या मुहूर्ताची प्रतीक्षा आहे.