शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

-आता ग्रामीण भागातही गृह विलगीकरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार १ ऑगस्टपासून प्रथमत: महापालिकेच्या क्षेत्रात इच्छुक रूग्णांना त्यांच्या घरीच विलगीकरणाची व्यवस्था असल्यास परवानगीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आता ग्रामीण भागातही रूग्ण आढळल्यास व त्यांच्यात लक्षणे नसतील तर त्यांना गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात येईल.

ठळक मुद्देसंवाद : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरापाठोपाठ आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इच्छुक कोरोनाबाधित रूग्णांनाही गृह विलगीकरणासाठी परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी येथे दिली.केंद्र शासनाने रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार १ ऑगस्टपासून प्रथमत: महापालिकेच्या क्षेत्रात इच्छुक रूग्णांना त्यांच्या घरीच विलगीकरणाची व्यवस्था असल्यास परवानगीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आता ग्रामीण भागातही रूग्ण आढळल्यास व त्यांच्यात लक्षणे नसतील तर त्यांना गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात येईल. तालुका आरोग्य अधिकारी हे त्यासाठी परवानगी प्राधिकारी असतील. त्याचप्रमाणे, ग्रामस्तरीय कोविड नियंत्रण समितीच्या सूचनाही या प्रक्रियेत विचारात घेतल्या जातील. ग्रामस्तरावरील आशा स्वयंसेविका, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हेही अंमलबजावणी प्रक्रियेत सहभागी असतील.इच्छुरूग्णास सुरुवातीला दोन दिवस संस्थात्मक विलगीकरणात अर्थात कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. कुठलीही लक्षणे न आढळल्यास गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात येईल. मात्र, रुग्णांचे किमान चार खोल्यांचे घर व त्यात दोन बाथरूम अटॅच्ड खोल्या असणे आवश्यक आहे. जेणेकरून रूग्णाला बाथरूमसह स्वतंत्र खोली राहण्यासाठी व उपचारासाठी वापरता येईल. इतर कुटुंबियांचीही सुरक्षितता जपली जाईल. गृह विलगीकरणासाठीचे सर्व नियमांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक असेल. स्वच्छता, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्स यांचा वापर करा, मास्क लावला नाही तर व्हेटिंलेटर लावायची वेळ येईल. अनेकदा रुग्णांत लक्षणे आढळत नाहीत. आपण कुणा रूग्णाच्या संपर्कात आलेलो असू, तर तत्काळ तपासणी करून घेणे आवश्यक आहे. बेपर्वा राहून कुटुंब आणि इतरांना जोखमीत टाकू नये. दक्षता काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जनजागरणासाठी व आरोग्य शिक्षणासाठी शासनाकडून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.आयटीआय परिसरात १०० बेडची सुविधाजिल्ह्यातील आरोग्य सुविधांत भर टाकण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. अतिदक्षता उपचार सुविधा बेडची संख्या सहाशेवर नेण्यात आली आहे. त्याशिवाय, विविध खासगी रूग्णालयांना उपचार सुविधांसाठी परवानगी देण्यात येत आहे. तसेच, हॉटेल्सनाही परवानगी देण्यात येत आहे. लिक्वीड ऑक्सिजनबाबतची अडचण लवकरच दूर होईल. त्यासाठी प्रयत्न होत आहेत. रूग्णसेवेसाठी आयटीआय परिसरात आणखी १०० बेडची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या