शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांची प्रवेश प्रक्रिया आता ‘आॅनलाईन’

By admin | Updated: February 28, 2016 00:31 IST

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई-२००९) अंतर्गत वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना ...

पारदर्शी पाऊल : येत्या सत्रापासून सुरुवात, अधिक अर्ज असल्यास ड्रॉअमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई-२००९) अंतर्गत वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खासगी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांत २५ टक्के प्रमाणात मोफत प्रवेश दिला जातो. या योजनेतील सावळागोंधळ सावरण्यासाठी येत्या शैक्षणिक सत्रात ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली. एखाद्या शाळेत मर्यादेपेक्षा अधिक प्रस्ताव असल्यास ड्रॉ काढला जाईल. प्राथमिक किंवा ज्या शाळेला पूर्व माध्यमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गाला एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. या उपक्रमात आणखी पारदर्शीपणा येण्यासाठी शिक्षण विभागाने २०१६-१७ पासून ही प्रक्रिया आॅनलाईन केली आहे.खासगी शाळांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविणे बंधनकारक केले आहे. मोफत प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या शैक्षणिक संस्थेविरुद्ध शिक्षण विभाग कारवाई करणार आहे. त्यानुसार २९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत शाळांची यादी निश्चित करून त्याचे आॅनलाईन रजिष्ट्रेशन करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ ते २८ मार्च या कालावधीत पालकाकडून प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहे. मर्यादेपेक्षा विद्यार्थ्यांचे अधिक प्रस्ताव आल्यास १ ते ५ एप्रिल या कालावधीत पहिला ड्रॉ काढण्यात येणार आहे.खासगी शाळांना करावी लागणार जनजागृतीआरटीई कक्षेतील खासगी शाळांना व्यापक जनजागृती अनिवार्यप्रवेश क्षमता व राखीव जागांचे बॅनर लावावे लागणार आहे. शाळेच्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध करावी लागणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याची यादी लावणे व शिल्लक जागांसाठी पुन्हा प्रक्रिया घ्यावी लागणार आहे.महत्त्वाची कागदपत्रेएक लाख रूपयांपर्यंत तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षकांनी जारी केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र.निवासी पुरावा आवश्यकआरटीईनुसार शाळांमध्ये प्रवेशासाठी निवासी पुरावा आवश्यक आहे. अर्ज दाखल करताना निवासी पुराव्याच्या आधारावर शाळांची यादी समोर येणार आहे. अर्जदारांच्या घरापासून तीन कि. मी. अंतरापर्यंत किती शाळा आहेत? याची यादी अर्ज भरताना समोर येईल, त्यानुसार प्रवेश क्षमता लक्षात येईल.