शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

भानामती नाहीच, ‘ती’ आग मानवी हस्तक्षेपामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

प्रकरणाच्या मुळाशी अभाअंनिसची चमू पोहोचली. आग लागण्याचे कारण शोधले गेले. घटनेमागे कुठलेही रहस्य वा भानामती नसून मानवी हस्तक्षेपामुळे आग लागत असल्याचा निष्कर्ष काढला. पडताळणीदरम्यान आसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, शिपाई  सतीश प्रधान हे उपस्थित होते. अंधश्रद्धेतून घडणाऱ्या या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर पाताबन्सी कुटुंबीयांचे  प्रबोधनही अभाअंनिसच्या चमूने केले. 

ठळक मुद्देअभाअंनिसने शोधले सत्य : पोलिसांच्या उपस्थितीत टाकरखेड्यातील ‘त्या’ घरात पडताळणी

  किशोर मोकलकर    लोकमत न्यूज नेटवर्कआसेगावपूर्णा : रहस्यमय आगीमुळे  घरातील काही कपडे पेटत असल्याच्या पातालबन्सी कुटुंबीयांच्या दाव्याचे शनिवारी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सत्यशोधन केले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ‘टीम अभाअंनिस’ने दाव्याची पडताळणी केली. सदर प्रकार हा मानवी हस्तक्षेपातून घडला आहे, असा निष्कर्ष अभाअंनिसने नोंदविला.‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध वृत्ताची तातडीने दखल घेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणेश हलकारे तसेच शेखर पाटील, हरीश केदार, राजू खिराडे, उल्का पाटील, कांचन दावेदार, सुनील पापडकर, ज्ञानेश्वर दाहेदार, संजय जिचकार, रवींद्र कोडे, प्रकाश कळसकर यांनी शनिवारी टाकरखेडा पूर्णा गाठून पातालबन्सी कुटुंबीयांतील प्रत्येक सदस्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. प्रकरणाच्या मुळाशी अभाअंनिसची चमू पोहोचली. आग लागण्याचे कारण शोधले गेले. घटनेमागे कुठलेही रहस्य वा भानामती नसून मानवी हस्तक्षेपामुळे आग लागत असल्याचा निष्कर्ष काढला. पडताळणीदरम्यान आसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, शिपाई  सतीश प्रधान हे उपस्थित होते. अंधश्रद्धेतून घडणाऱ्या या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर पाताबन्सी कुटुंबीयांचे  प्रबोधनही अभाअंनिसच्या चमूने केले. 

भानामती, अतिंद्रीय, दैवी, अमानवी वा अदृश्य शक्ती अस्तित्वात नाहीतच. पातालबन्सी यांच्या घरात अचानक आग लागण्याचा प्रकार कुठल्याही शक्तीशी संबंधित नसून, त्यामागे मनुष्य हस्तक्षेप आहे. सत्यशोधन यशस्वीपणे केले गेले. तथापि, समितीच्या धोरणानुसार संबंधितांचे नाव जाहीर करता येणार नाही. मात्र, हा प्रकार आता बंद होईल.     - गणेश हलकारे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अभाअंनिस

पातालबंसी सदस्यांशी स्वतंत्र चर्चाअभाअंनिसने पातालबन्सी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची बंद दाराआड पडताळणी केली. सर्वांंची पडताळणी झाल्यानंतर सर्वांना एकत्र आणून पुन्हा आपल्या घरात असा प्रकार होणार नाही, असे समितीने कुटुंबीयांना आश्वासन दिले. कुटुंबीयांनीही दोन-तीन दिवसांपासून असला प्रकार होत नसल्याचे सांगितले.

विद्युत पुरवठा जोडलापातालबंसी कुटुंबाच्या घरात घडणाऱ्या आगीच्या मुळाशी शॉर्ट सर्किट असल्याच्या संशयामुळे विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. तो आता पूर्ववत केला आहे.

टॅग्स :Policeपोलिसfireआग