शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांद्वारे गैरमार्गाचा अवलंब

By admin | Updated: September 25, 2015 00:57 IST

शहरातील बहुतांश शाळांमध्ये पायाभूत चाचणीला सुरुवात झाली आहे. २२ सप्टेंबर रोजी मणिबाई गुजराती हायस्कूल व २३ सप्टेंबरला गोल्डन किड्स स्कूलमध्ये चाचणी पार पडली.

अमरावती : शहरातील बहुतांश शाळांमध्ये पायाभूत चाचणीला सुरुवात झाली आहे. २२ सप्टेंबर रोजी मणिबाई गुजराती हायस्कूल व २३ सप्टेंबरला गोल्डन किड्स स्कूलमध्ये चाचणी पार पडली. शहरातील सेंट फ्रान्सिस स्कूलमध्ये २४ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत बहुतांश शाळांमध्ये ही चाचणी परीक्षा घेण्यात आली. मात्र, शहरातील काही शाळांमध्ये पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित दिली जात असल्याची धक्कादायक माहिती 'लोकमत'ला मिळाली आहे. या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीतील प्रश्नांची लेखी उत्तरे देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे तात्पुरते हित साधले जात असले तरी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मात्र दूरगामी अप्रिय परिणाम होणार आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया कच्चा राहू नये यासाठी शासनाने त्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्याकरिता चाचण्यांचे नियोजन आखले आहे. मात्र विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना असा गैरमार्गाचा अवलंब करण्यास शिकविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकच असे गैरप्रकार करीत असतील, तर शैक्षणिक दर्जा उंचावणार कसा? असाही प्रश्न निर्माण होतोच. पायाभूत चाचणीचे गुणाकंन आॅनलाईनप्रत्येक शाळेत शासनाच्या आदेशानुसार पायाभूत चाचणीला सुरुवात झाली आहे. या चाचणीतील विद्यार्थ्यांचे गुणांकन शासनाला आॅनलाईन कळविण्यात येणार आहे. यामध्ये जे विद्यार्थी अभ्यासात मागे असतील, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे या पायाभूत चाचण्यांना महत्व आहे.