शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा नव्याने प्रस्ताव

By admin | Updated: June 23, 2014 23:38 IST

अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा नव्याने प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने घेतला आहे.

गणेश वासनिक - अमरावतीअमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा नव्याने प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने घेतला आहे. त्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी करण्यासाठी प्राधिकरणाची चमू येत्या आठवड्यात दाखल होणार आहे. यापूर्वी तयार करण्यात आलेल्या विमानतळ विस्तारीकरण्याच्या प्रस्तावाला रद्द करण्यात आले आहे, हे विशेष.राज्य शासनाने बेलोरा विमानतळाचा विकास व विस्तारीकरणाची जबाबदारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपविली होती. त्यानुसार दिल्ली येथील विमानतळ प्राधिकरणाच्या चमुने काही महिन्यांपूर्वी बेलोरा विमानतळाची पाहणीसुध्दा केली. तीन सदस्यीय चमुने विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात अहवालसुध्दा दिला आहे. बेलोरा विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरण शक्य असल्याचे या अहवालात नमूद आहे. मात्र कालांतराने राज्य शासनाने विमानतळाच्या विकासाचे धोरण बदलविल्याने याचा फटका बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाला बसल्याची माहिती आहे. दरम्यान राज्य शासनाने बेलोरा विमानतळाच्या रन-वे दुरुस्ती व डागडूजीची प्रलंबित ठेवलेली फाईल त्वरेने मंजूर करुन येथे विमान लँडींगची होत असलेली गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक वर्षांपासून विमानतळ विस्तारिकरणासाठी घेतलेल्या जमिनीचा कधी उपयोग होणार असा सवाल, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा यापूर्वी २५० कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरीसुध्दा दिली होती. मागील अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विमानतळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित केले होते. मात्र विकासाचे धोरण बदलताच बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे ठरविण्यात आल्याने पुन्हा नवा प्रस्ताव, नव्या फाईली असा प्रवास सुरु होणार आहे. बेलोरा विमानतळाचा विकास व विस्तारीकरणाचा प्रस्ताव हा आता ३०० कोटींच्या वर जाईल, अशी माहिती आहे. मुंबई येथील महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे प्रबंधक वाला हे येत्या आठवड्यात बेलोरा विमानतळाची पाहणी करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या सोबत चार ते पाच जणांची चमू येत असल्याची माहिती आहे. ही चमू बेलोरा विमानतळ हे पर्यावरण दृष्ट्या योग्य की अयोग्य? याची चाचपणी करणार आहेत. विमानतळावर पाण्याची सोय, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, रन-वे, रस्ते, टर्मिनल इमारत, एटीएस इमारत, प्रकाश व्यवस्था आदींची पाहणी करुन शासनाला विस्तारीकरणाबाबतचा अहवाल सादर करणार आहे.