शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

डीटीएडला नवा लूक 'डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन'

By admin | Updated: May 10, 2015 00:39 IST

डी.एड. व बी.एड.च्या सध्याच्या स्थितीबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांचे संशोधन सुरू आहे.

विद्यार्थ्यांचा ओढा वाढणार : अभ्यासक्रमातील बदल स्वागतार्हजितेंद्र दखने अमरावतीडी.एड. व बी.एड.च्या सध्याच्या स्थितीबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांचे संशोधन सुरू आहे. त्याचा घसरता आलेख सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. राज्यातील शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम डीटीएड आता डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन (डीएलएड) नावाने ओळखला जाणार आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येणार असून त्याचा आराखडादेखील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे डीटीएडला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढणार, का याबाबत संस्थाचालकांमध्ये उत्सुकता आहे. दिवसेंदिवस डीटीएडला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी होत असून त्याची विद्यार्थ्यांमध्ये क्रेझही कमी होत आहे. या अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाची वाढलेली संख्या व घसरलेला दर्जा यावर सातत्याने टीका केली जाते. त्यातच आता एनसीएफटीई २००९ व एसीटीई रेग्युलेशन सन २०१४ मधील मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम डीएलईडी पुनर्रचित केलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाकडे ओढा वाढणार असल्याची सुचिन्हे आहेत. त्यामुळे हा बदल लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. असा असेल आराखडानव्याने प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष कामाला प्राधान्य देणे, विद्यार्थ्यांना २० आठवडे शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करणे अशा काही मुद्यांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एटीकेटी असावी का? पदविका अभ्यासक्रमातही सेमी इंग्रजी सुरू करावे का? कार्यानुभव, कला, शारीरिक शिक्षण या विषयांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर न ठेवता ती परिषदेकडून घेण्यात यावी का? याबाबत परिषदेने अभिप्राय मागविले आहे. परिषदेच्या ६६६.ेीूी१३.ङ्म१ॅ.्रल्ल या वेबसाईटवर नवीन आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर अभिप्राय मागविण्यात येत आहेत.पदविकेसाठीही श्रेयांकनव्या आराखड्यानुसार माहिती तंत्रज्ञान हा स्वतंत्र विषय न ठेवता नियमित विषय शिकविताना माहिती तंत्रज्ञनाचा वापर कसा करावा हे शिकविण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार आता पदविका अभ्यासक्रमासाठीही श्रेयांक पद्धत लागू होण्याची शक्यता आहे. डीएडची क्रेझ पूर्वी खूप होती. त्यावेळी प्रवेशासाठी स्पर्धाही मोठ्या प्रमाणात होती. बदलत्या परिस्थितीनुसार यात बदल आवश्यक होते. त्यानुसार संशोधन परिषद स्तरावर यासंदर्भात कारवाई सुरू आहे. यामुळे या अभ्यासक्रमाची क्रेझ वाढण्यास नक्कीच फायदा होईल. - श्रीराम पानझाडे,प्राथमिक शिक्षणाधिकारी.