पोदारच्या विद्यार्थ्यांसह शाखेची राष्ट्रीय स्तरावर उपलब्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:23+5:302021-02-05T05:29:23+5:30

अमरावती : स्थानिक पोदार इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी विभिन्न क्षेत्रात राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर यशाचे शिखर गाठले. यामध्ये ...

National level achievement of the branch with Podar students | पोदारच्या विद्यार्थ्यांसह शाखेची राष्ट्रीय स्तरावर उपलब्धी

पोदारच्या विद्यार्थ्यांसह शाखेची राष्ट्रीय स्तरावर उपलब्धी

अमरावती : स्थानिक पोदार इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी विभिन्न क्षेत्रात राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर यशाचे शिखर गाठले. यामध्ये इयत्ता ८ वी चा विद्यार्थी अनिश प्रमोद पडोळेची केंद्र शासनाने विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयद्वारा इंस्पायर अवार्डसाठी अमरावती जिल्हयातून निवड झाली.

आनेश पडोळेला १० हजार रुपयांचे पारितोषिकसुद्धा मंत्रालयाद्वारा प्रदान केले गेले. सोबतच कृती रोहित सिंघई हिने महाराष्ट्र शासनाद्वारा आयोजित प्रि-सेकेन्डरी स्कॉलरशिप परीक्षेच्या स्टेट मेरीट लिस्टमध्ये स्थान प्राप्त केले. विद्यार्य्यांसोबतच शिाक्षकांनीसुध्दा विशेष उपलब्धी मिळविली. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाबदवारा मीनाक्षी मिश्रा, शिल्पा कथने, स्वप्निल रणित यांना ट्रन्सफार्मिंग एज्युकेशन अवार्डने सम्मानित करून प्रमाणपत्र, मेडल यासोबतच प्रति शिक्षक १० हजार अपये तसेच शाळेला उत्कृष्ट प्रदर्शनासाठी २० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले गेले. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीदवारा सुहानी वैष्णव, चित्ततोष ईनामदार, श्रावणी धवणे, पार्थ आरूडकर या विद्यार्थ्यांना उपलब्धी पमाणपत्र प्रदान केले गेले. प्राचार्य महाजन यांनी या यशासाठी शाळेची गुणवत्तमयी शिक्षण प्रणाली व कार्ययोजना तसेच पोदार फॅकल्टीच्या मार्गदर्शनाची प्रशंसा केली. यावर अर्चना देशपांडे, मीनाक्षी मिश्रा, भूषण पथे. आशिष खुले तसेच पोदार फॅकल्टीने आनंद व्यक्त केला.

Web Title: National level achievement of the branch with Podar students