शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘वोंब ऑफ मेळघाट’ माहितीपटाला राष्ट्रीय मानव अधिकार आयोगचा द्वितीय पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

पुनर्वसनग्रस्त आदिवासींच्या व्यथा, नवी दिल्लीत झालेल्या लघु चित्रपट महोत्सवात यश पंकज लायदे/धारणी : नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ...

पुनर्वसनग्रस्त आदिवासींच्या व्यथा, नवी दिल्लीत झालेल्या लघु चित्रपट महोत्सवात यश

पंकज लायदे/धारणी : नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोग लघुचित्रपट महोत्सव २०२० स्पर्धेत महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजविले. विजेते चित्रपट मानवी हक्कांचे होत असलेले हनन आणि सामाजिक उपेक्षा यांवर प्रकाश टाकतात. आयोगाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या माहिती पत्रकात अत्यंत मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारात दोन लक्ष रुपयांचा प्रथम पुरस्कार रवींद्र माणिक जाधव यांच्या ‘थलसार बंगसार’ या कोकणी लघुपटाला देण्यात आला, तर दीड लक्ष रुपयांचे सामायिक द्वितीय पारितोषिक डॉ. नितीन वसंतराव गणोरकर यांच्या ‘वोंम्ब ऑफ मेळघाट’ आणि थोमास जाकोब यांच्या ‘अन्नाम’ या मल्याळी लघुचित्रपटाला बहाल करण्यात आला. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सहाव्या लघुचित्रपट महोत्सवात संपूर्ण भारतातून ९३ स्पर्धकांची नोंद झाली.

‘वोंम्ब ऑफ मेळघाट’ हा माहिती चित्रपट निसर्गाशी वंशागत जुळून असलेल्या मेळघाटमधील आदिवासी समुदायाचे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून विस्थापनानंतर किती सामाजिक आणि प्रशासनिक समस्यांशी झुंजतो, हे या माहितीपटात मुख्यतः चित्रित केलेले आहे. ९ मिनिट ५४ सेकंदाची लांबी असलेला हा माहितीपट महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायद्यातील तरतुदींच्या प्रशासनिक उल्लंघनावर प्रखरपणे प्रकाश टाकतो.

व्याघ्र संवर्धन प्रकल्पबाधित मेळघाटातील पुनर्वसित आदिवासी बांधवांच्या उपेक्षा आणि विवंचना, शासन यंत्रणेकडून होत असलेला प्रचंड मनस्तापाचा उलगडा चुर्णी, वैराट आणि पस्तलाई गावच्या पुनर्वसित प्रकल्पबाधितांनी केला. सन २००१-०२ पासून ते २०१८ पर्यंत बोरी, कोहा, कुंड, चुर्णी, वैराट, अमोना, नागरतास, बरुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा, केलपानी, डोलार आणि पस्तलई या आदिवासी गावांचे पुनर्वसन शासनाने केले आहे. प्रकल्पबाधितांना मूलभूत सोई-सुविधांपासून शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले आहे, असे पुनर्वसित आदिवासी ग्रामस्थ सांगतात.

‘वोंम्ब ऑफ मेळघाट’चे चित्रीकरण आणि संपादन ऋषीकेश खंबायत यांनी केले. मूर्त रूप साकारण्यासाठी डॉ. निशा केमसे-कांबळे यांनी उत्पाद नेपथ्य विभाग सांभाळला. प्रा. स्वप्निल कांबळे यांचे सहदिग्दर्शन करून मोलाचे मार्गदर्शक योगदान राहिले. ‘वोंम्ब ऑफ मेळघाट’चे चित्रीकरण करण्यासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य फर्ग्युसन कॉलेज (पुणे), टाटा सामाजिक विज्ञान (मुंबई), अमरावती जिल्हाधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व वनविभाग कर्मचारी आणि अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाचे सहकार्य लाभले. माहितीपटाला निर्मिती अर्थसाहाय्य शिल्पा शिवणकर-कांबळे, ऋषीकेश कीर्तीकर, डॉ. संदीप राऊत, अनिरुद्ध राऊत, ज्ञानेश्वर बांगर, जय प्रकाश, गौतम पाटील, उत्तम साहू, रोहिणी शिवकुमार, नेहा राय, अजित कुमार पंकज, दीप चंद यांनी केले तसेच आशिष तरार, श्रेयस पन्नासे, शंतनु पुंड, राहुल तऱ्हेकर, साक्षी आंबेकर, रोहिणी बुंदेले, माधुरी गणोरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.