शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

३४ महाविद्यालयांचे नॅक नामांकन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 18:29 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३४ अनुदानित महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन लॉकडाऊनमुळे रखडले आहे. यापूर्वी या महाविद्यालयांना नॅकसाठी मार्च २०२० ही डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, आता यूजीसीने पुढाकार घेत ऑगस्टमध्ये मूल्यांकन घेण्याचे निश्चित केले आहे.

ठळक मुद्देऑगस्टमध्ये यूजीसी चमूद्वारे होणार पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३४ अनुदानित महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन लॉकडाऊनमुळे रखडले आहे. यापूर्वी या महाविद्यालयांना नॅकसाठी मार्च २०२० ही डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, आता यूजीसीने पुढाकार घेत ऑगस्टमध्ये मूल्यांकन घेण्याचे निश्चित केले आहे.विद्यापीठाशी संलग्न १५२ अनुदानित महाविद्यालये आहेत. त्यापैकी ३४ महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद (नॅक) ची मान्यता मिळविली नव्हती. राज्य शासनाच्या ८ आॅक्टोबर २०१० च्या निर्णयानुसार या महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत नॅक नामांकन आवश्यक केले होते. त्याअनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने संंबधित महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाप्रमुखांना स्मरणपत्रही दिले होते. त्यानुसार कार्यशाळासुद्धा घेण्यात आल्या आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे नॅक रखडले आहे.अकोला येथील सुधाकरराव नाईक महाविद्यालय, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील वसंतराव नाईक महाविद्यालय, यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील जिजामाता महाविद्यालय, तर पांढरकवडा येथील शिवाजीराव मोघे महाविद्यालयांचे नॅक नामांकनासाठी प्रस्ताव सादर आहेत.अगोदर दोन महाविद्यालयांचे नॅक झाले आहे. चार महाविद्यालयांचे प्रस्ताव प्राप्त झाले असताना, लॉकडाऊनमुळे चमूला पाहणी करता आली नाही. या चारही महाविद्यालयांना यूजीसीकडून नॅक मूल्यांकनासाठी ऑगस्ट महिन्यात तारीख देण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.- केशव तुपे, सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण अमरावती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र