शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

शिरीष चौधरींच्या वक्तव्यात गूढ

By admin | Updated: September 11, 2016 00:06 IST

नरबळीच्या उद्देशाने मुलांवर जीवघेणे वार करायचे. नरबळीचा डाव फसला...

काही लपविले तर जात नाही ना?उलगडण्यालायक बरेच काही : बाथरूम शब्दाभोवती संशयाचे वलयअमरावती : नरबळीच्या उद्देशाने मुलांवर जीवघेणे वार करायचे. नरबळीचा डाव फसला तर प्रशासकीय यंत्रणेला खोटी माहिती पुरवून तसे दस्तावेज तयार करायचे. पुढे त्यांचा पुरावा म्हणून वापर करायचा, अशी ‘मोड्स अ‍ॅप्रेंडी’ तर आश्रमातून वापरली जात नाही ना, अशी शंका उपस्थित होते. अजयचा चेहरा दगडाने ठेचल्यानंतर तो बाथरूममध्ये पाय घसरून पडला, अशी माहिती आश्रमातील मंडळींनी अंजनसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.राजीव पाटील यांना दिली होती. त्यानुसारच मी नोंद घेतली, असे डॉ.पाटील यांनी 'लोकमत'ला सांगितले. पुढे तोच शासकीय दस्तावेज पुरावा म्हणून आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी पत्रपरिषदेदरम्यान सादर केला. डॉक्टरांच्या नोंदीनुसारच, आश्रमाने त्याच्या आईला माहिती दिल्याची भूमिका शिरीष चौधरी यांनी मांडली होती; तथापि डॉ.पाटील यांच्यानुसार प्रकरण उलटे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच हा निर्दोषत्त्वाचे पुरावे निर्माण करण्याचा तो नियोजित प्रयत्न तर नाही ना, याकडे तपास अधिकाऱ्यांना दुर्लक्ष करता येणार नाही. स्वच्छतागृह आले कुठून ?आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी डॉक्टरांच्या हवाल्याने आम्ही बोललो, अशी जी भूमिका घेतली त्यानुसार आणखी एक गूढ निर्माण होते. तात्पुरत्या इलाजाच्या रकाण्यात डॉक्टरांनी ‘अ‍ॅक्सिडेन्टल फॉल डाऊन’ अर्थात् अपघाताने कोसळल्याचा उल्लेख केला आहे. या उल्लेखात स्वच्छतागृह अर्थात् बाथरूम हा शब्द कुठेही नाही. मग सवाल हा उपस्थित होतो की, अजय बाथरूममध्ये पडला, असे त्याच्या आईला का सांगण्यात आले? निरोप देण्याऱ्यांनी बाथरूम हा शब्द आणला कुठून? अजय बाथरूममध्ये पाय घसरून पडला असेल तर- बाथरूममध्ये पडल्यावर तो शुद्धीवर होता की बेशुद्ध? शुद्धीवर असेल तर त्याच्या झोपण्याच्या ठिकाणापर्यंत तो स्वत: आला काय? येऊन तेथे तो पुन्हा गुपचूप झोपला काय? स्वत: आला असेल तर त्याला ते आठवत का नाही? अजय बाथरूममध्येच बेशुद्धावस्थेत पडलेला असेल तर पहिल्यांदा त्याला कुणी बघितले? बाथरूममधून त्याला आणले कुणी? आणल्यावर त्याला पुन्हा त्याच्या झोपण्याच्याच जागेवर ठेवले गेले काय? ठेवले असल्यास तसे करण्याचे कारण काय? अजयला पहिल्यांदा बघणाऱ्याने कुणाकुणाला माहिती दिली होती? कार्यकारी अध्यक्ष या नात्याने शिरीष चौधरी यांना या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासादरम्यान विचारण्यात न आल्यास तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी ती चौधरींना बेकायदारीत्या दिलेली मुभा ठरेल. डॉक्टरांना खोटी माहिती देऊन आश्रमातील मंडळींनी तसा पुरावा मुद्दामच निर्माण केला असेल तर तपास अधिकाऱ्याने त्या मुद्याचाही नरबळीशी संबंध तपासला जावा. काही लपविले तर जात नाही ना, याचा प्रामाणिक तपास अजय आणि प्रथमेशला न्याय देऊ शकेल.