शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

९४ गहाण भूखंडांची परस्पर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST

अचलपूर नगर परिषदेचा बोजा, प्लॉटधारक अडचणीत परतवाडा : अचलपूर नगर परिषदेकडे गहाण ठेवलेल्या भूखंडांची (प्लॉटची) संबंधित ले-आऊटधारकांनी परस्पर विक्री ...

अचलपूर नगर परिषदेचा बोजा, प्लॉटधारक अडचणीत

परतवाडा : अचलपूर नगर परिषदेकडे गहाण ठेवलेल्या भूखंडांची (प्लॉटची) संबंधित ले-आऊटधारकांनी परस्पर विक्री केली आहे. विकल्या गेलेल्या या गहाण ९४ प्लॉट (भूखंड) वर नोव्हेंबर २०२० मध्ये नगर परिषदेचा बोजा चढविण्यात आला आहे. प्लॉटच्या सातबारावर तशी नोंद करण्यात आली आहे. यात या प्लॉटधारकांच्या अडचणीत वाढ झाली असून, नगर परिषदेच्या बोजाबाबत ते अनभिज्ञ आहेत.

अचलपूर नगरपालिका क्षेत्रांतर्गंत खेल बारी, खेल त्र्यंबक नारायण, खेल तपमाळी, परतवाडा, खेल टेकाळ, रायपुरा, खेल देवमाळी यांसह अन्य भागात ४९ ले-आऊटधारकांनी १७१ प्लॉट अचलपूर नगर परिषदेकडे गहाण ठेवले आहेत. ले-आऊटमधील विकासकामांसह पायाभूत सुविधांची हमी हे प्लॉट गहाण ठेवून नगर परिषदेला दिली होती. पण, यातील अनेक ले-आऊटमध्ये आजही पायाभूत सुविधा ले-आऊटधारकांनी केल्या नाहीत. तेथील अत्यावश्यक पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने विकासात्मक कामे त्यांनी केली नाहीत. ले-आऊटमधील मोकळ्या भूखंडाचे (ओपन स्पेस) लेआऊटधारकांनी नगर परिषदेकडे रीतसर हस्तांतरणही केले नाही.

ले-आऊटधारकांना पायाभूत सुविधा अंतर्गत विकासकामे एका वर्षात पूर्ण करणे ले-आऊटधारकांना बंधनकारक होते. मुद्रांकावर त्यासंबंधी गहाण खतही नगर परिषदेला दिले. नागरी सुविधा विकसित न करता, खुल्या भूखंडाचे हस्तांतरण न करता गहाण भूखंड ले-आऊटधारकांनी परस्पर विकल्याचे नगरपालिकेच्या निदर्शनास आल्याने २०१९ मध्ये मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस दिल्या आहेत.

—————————-