शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

मुरलीधर महाराजाने उतरविली साधूची खोळ

By admin | Updated: January 12, 2017 00:09 IST

चांदूरबाजार येथील न्यायालयात बयाण नोंदविण्याकरिता सोमवारी आधुनिक वेशभूषेत पोहोचलेल्या बहुचर्चित मुरलीधर महाराजांना पाहून नागरिकांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले.

आधुनिकअवतारात पोहोचले न्यायालयात : नागरिकांना आश्चर्याचा धक्काअमरावती : चांदूरबाजार येथील न्यायालयात बयाण नोंदविण्याकरिता सोमवारी आधुनिक वेशभूषेत पोहोचलेल्या बहुचर्चित मुरलीधर महाराजांना पाहून नागरिकांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. एरवी भगवी कफनी आणि डोक्यावरील भगव्या फेटा अशा वेशभूषेत असणाऱ्या महाराजांना पाहून न्यायालय परिसरात उपस्थित बघ्यांची कुजबुज सुरू झाली होती. टी-शर्ट, गॉगल, फॉर्मल पँट अशा वेषातील महाराजांना तर अनेकांनी ओळखले देखील नाही. येलकीपूर्णा मठातील मुरलीधर महाराजांच्या रासलीला प्रकरणी महाराजांच्या विरोधात शफीक राजाने आसेगाव पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर मुरलीधर महाराजांनीही शफीक राजाविरूद्ध तक्रार दिली. महाराजांच्या रासलीलेच्या ‘व्हिडीओ क्लिप’ व्हायरल झाल्यामुळे हेप्रकरण राज्यभरात चर्चिले गेले. मात्र, यातील पीडित महिलांनी याप्रकाराबाबत कोणताही आक्षेप न घेतल्याने व तसे बयाण पोलिसांना दिल्यानंतर याप्रकरणाला वेगळे वळण मिळाले. महिलांची महाराजाविरूद्ध तक्रार नसल्याने पोलिसांसमोरही कारवाईचा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान अश्लिल चित्रफित व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप करीत क्लिपमधील एका महिलेने शफीक राजाविरुद्ध आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी शफीक राजाविरुद्ध गुन्हा देखील नोंदविला. मुरलीधर महाराजावर पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे शफीक राजा यांनी चांदूरबाजार न्यायालयात अर्ज केला. आसाराम बापूविरूद्धच्या खटल्याचा हवालाअमरावती : न्यायालयाने सोमवारी सुनावणीची तारीख दिली होेती. तत्पूर्वी शफीक राजाविरोधात महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ९ जानेवारी रोजी मुरलीधर महाराज आलिशान कारमधून आधुनिक पेहेरावात न्यायालयात पोहोचले. उपस्थितांनी त्यांना ओळखले नाही. मात्र, न्यायालयात त्यांच्या नावाचा पुकारा झाल्यानंतर महाराजांचे बदलेले रूप पाहून अनेकांना झटका बसला. पश्चात तीन तास महाराजांचे बयाण न्यायालयात नोंदविले गेले. मंगळवारी शफीक राजा यांचे वकील कुंदन पडोळे यांनी चांदूरबाजार न्यायालयाचे न्यायाधीश बी.ए.गुलाटी यांच्यासमोर बाजू मांडली. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हवाला दिला. हरियाणा येथील सत्पालसिंहविरुद्ध हरियाणा सरकार असा तो खटला होता. त्यानिर्णयाच्या आधारे आसाराम बापू यांचा जामीन रद्द करण्यात आला होता.