शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यात दूषित पाणी!

By admin | Updated: March 26, 2017 00:10 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे अप्पर प्लेटो भागात जीवन प्राधिकरणामार्फत केला जाणारा .....

पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष : जलजन्य रोगांची लागण, नगरसेविकेची तक्रारचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे अप्पर प्लेटो भागात जीवन प्राधिकरणामार्फत केला जाणारा पाणीपुरवठा दूषित, दुर्गंधीयुक्त असून यामुळे अनेकांना जलजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिखलदरा शहर दोन टप्प्यात वसले असून, अप्पर प्लेटो परिसरातील पांढरी, रेंजर कॉलेज, विश्रामगृह परिसराला मागील १५ दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात जीवन प्राधिकरणासह संबंधित कार्यालयाला वारंवार निवेदन देऊनसुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याची तक्रार नगरसेविका सुनीता इग्रपवार यांनी केली आहे. चिखलदरा तालुक्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे हे विशेष. (तालुका प्रतिनिधी )जलजन्य आजाराने नागरिक त्रस्त : सतत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांना नाइलाजास्तव पिण्यासाठी त्याच पाण्याचा वापर करावा लागत आहे. परिणामी अनेकांना अतिसार, अंगावर पांढरे डाग, खाज सुटणे, अशा प्रकारचे आजार झाले आहेत. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. पिण्यायोग्य नसल्याचा अहवालजीवन प्राधिकरण विभागामार्फत होणारा पाणीपुरवठा पूर्णत: दूषित व पिण्यायोग्य नसल्याचे प्रयोग शाळेत केलेल्या तपाणीत आढळून आले आहे. तरीसुद्धा दररोज दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून, पाण्यामध्ये क्लोरीन, तुरटी टाकून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागील १५ दिवसांपासून अप्पर प्लेटो परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे अनेकांना जलजन्य रोगाची लागण झाली आहे. जीवन प्राधिकरण व नगरपालिकेला पत्र दिले आहे. मात्र, त्यावर पूर्णत: दुर्लक्ष केल्या जात आहे. - सुनीता इग्रपवार, नगरसेविका, चिखलदरा