शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बहिरममध्ये माकडांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

बहिरम मंदिरावर शंभर दीडशे, अडना घाटात शंभर दीडशे तर बहिरम यात्रा परिसरात ७० ते ८० लालतोंडे माकडे डेरेदाखल आहेत. या लालतोंड्या माकडांपासून सर्वजण त्रस्त झाले आहेत. माणसांनाच नव्हे तर काळतोंड्या माकडांनाही ही लालतोंडी माकडं नकोशी झाली आहेत. अरे म्हटले, हात उगारला किंवा काठी दाखवली की, ही लालतोंडी माकडे त्याचा पिच्छाच पुरवतात.

ठळक मुद्देअनेकांना चावा : अडना घाटातही डेरा, शंभर-दीडशेच्या कळपाने वावर

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : श्री सिद्ध क्षेत्र बहिरममध्ये एक महिन्यांपासून लालतोंड्या माकडांनी दहशत पसरवली आहे. बहिरम -बैतूल मार्गावरील अडना घाटातही त्यांनी डेरा जमविला आहे.ही लालतोंडी माकडे आक्रमक प्रवृत्तीचे असून त्यांनी आतापर्यंत अनेकांना चावा घेतला आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला धड उभेही ते राहून देत नाहीत. माणसांच्या अंगावर ते धावून जात आहेत. त्यांच्या हातातील पिशवी, वस्तू, सामान, साहित्यही ते पळवून नेत आहेत.यापूर्वी बहिरम किंवा अडना घाटात ती लालतोंडी माकडे नव्हती. काळ्या तोंडाची माकडे तेवढी वास्तव्याला होती. आज मात्र या काळ्या तोंडाच्या माकडांना या लालतोंड्या माकडांनी बहिरम मंदिर परिसरातून, अडना घाटातून हाकलून लावले आहे.काळ्या तोंंडाच्या माकडांवर हे लालतोंंडी माकडे तुटून पडतात. त्यांच्याशी झुंजतात. काळ्या तोंडाचे माकड दिसले की वेगवेगळ्या प्रकारचा आवाज काढून लालतोंडे आपल्या सवंगड्यांना बोलावून एकत्रितपणे लढतात.बहिरम मंदिरावर शंभर दीडशे, अडना घाटात शंभर दीडशे तर बहिरम यात्रा परिसरात ७० ते ८० लालतोंडे माकडे डेरेदाखल आहेत. या लालतोंड्या माकडांपासून सर्वजण त्रस्त झाले आहेत. माणसांनाच नव्हे तर काळतोंड्या माकडांनाही ही लालतोंडी माकडं नकोशी झाली आहेत. अरे म्हटले, हात उगारला किंवा काठी दाखवली की, ही लालतोंडी माकडे त्याचा पिच्छाच पुरवतात. ती व्यक्ती जोपर्यंत त्यांच्या नजरेआड होत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाहीत. सुतळी बॉम्ब फोडला की कार्बाईडच्या बंदुकीतून आवाज करा, ही माकडे त्याकडे साधे लक्षही देत नाहीत.वनविभागाने बंदोबस्त करावाशेकडोच्या संख्येत बहिरममध्ये दाखल झालेल्या लालतोंडे माकडांना वन विभागाने पकडून जंगलात सोडावे. त्या माकडांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी यात्रेकरुंसह गावकऱ्यांनी केली आहे. बहिरम तीर्थस्थळी ये-जा करणारे पर्यटक आणि बहिरम-बैतूल मार्गावरील अडना घाटातून दुचाकीने प्रवास करणाऱ्यांनी या माकडांपासून सावधानता बाळगण्याच्या सूचना बहिरम मंदिर ट्रस्टच्यावतीने ट्रस्टींनी केल्या आहेत.

वनविभागावर आरोपबहिरममध्ये यापूर्वी कधीही लालतोंडी माकडे नव्हती. वनविभागाने ती बहिरमात आणून सोडल्याचा आरोप गावकºयांसह यात्रेकरुंनी केला. मात्र ती माकडे मध्यप्रदेशातील असल्याचे येथील वनविभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :forestजंगल