शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार केल्यास ‘मकोका’!

By admin | Updated: May 19, 2016 00:09 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) योजनेंतर्गत कामामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर ‘मकोका’ (संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा)

अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) योजनेंतर्गत कामामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर ‘मकोका’ (संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात मनरेगाच्या राज्य आयुक्तांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहे. मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक ठिकाणी मजुरांना कामे उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, अशा तक्रारी मनरेगाच्या नागपूर येथील आयुक्त कार्यालयाकडे दाखल आहेत त्या अनुषंगाने मनरेगा अंतर्गत कामाच्या नियोजनाची यादी ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध असणे आवश्यक आहे. जे अधिकारी मनरेगाअंतर्गत कामाचे नियोजन तयार ठेवणार नाहीत, अशा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही मनरेगा आयुक्तांनी दिले आहे. याशिवाय मनरेगांतर्गत कामामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात यावी. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे निर्देश मनरेगाचे आयुक्त अभय महाजन यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यपालन अधिकारी व सहजिल्हा कार्यक्रम समन्वयकांना दिले आहे. (प्रतिनिधी)