सहायक पोलीस निरीक्षकांच्या पार्थिवावर मध्यरात्री अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST2021-02-09T04:15:11+5:302021-02-09T04:15:11+5:30

रात्र जागून काढली : आत्महत्येचे कारण अस्पष्टच धारणी : येथील पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक अतुल तांबे ...

Midnight funeral on the body of Assistant Police Inspector | सहायक पोलीस निरीक्षकांच्या पार्थिवावर मध्यरात्री अंत्यसंस्कार

सहायक पोलीस निरीक्षकांच्या पार्थिवावर मध्यरात्री अंत्यसंस्कार

रात्र जागून काढली : आत्महत्येचे कारण अस्पष्टच

धारणी : येथील पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी शासकीय निवासस्थानात ७ फेब्रुवारी रोजी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. उत्तरिय तपासणीनंतर त्यांचे पार्थिव अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तद्नंतर रात्री दीडच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अमरावतीस्थित हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

अतुल तांबे यांचा गळफास घेतलेला मृतदेह पाहताच त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडला. त्या आवाजाने अनेकांनी तेथे धाव घेतली. पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी हे तत्क्षण तेथे दाखल झाले. तांबे कुटुंबीयांना विश्वासात घेऊन कुळकर्णी यांनी तांबे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. उपजिल्हा रुग्णालयातील वैदयकीय अधिकारी धनंजय पाटील, आसिफ शेख व फुलचंद जामकर या चमूने रविवारी सायंकाळी सात वाजता शवविच्छेदन केले. तसा अहवाल पोलिसांना दिला. त्यांनतर त्यांचे पार्थिव कुटुंबियांच्या सुपूर्द करण्यात आले. ते पार्थिव रूग्णवाहिकेत टाकून ठाणेदार विलास कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे यांनी तांबे यांचे वडील, पत्नी व मुलीला सोबत घेतले. त्यादरम्यान तांबे यांचे अकोला येथील नातेवाईक सेमाडोह येथे थांबले होते. त्यांना सोबत घेऊन रात्री १२ च्या सुमारास तांबे यांचे पार्थिव अमरावतीच्या सातुर्णा भागातील त्यांच्या निवासात पोहोचले. नातेवाईक व शेजाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर रात्री दीडच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलीस कर्मचाºयाला संदेश

सहायक पोलीस निरीक्षक अतुल तांबे हे शनिवारच्या रात्री जागीच होते. पोलीस कर्मचारी अरविंद सरोदे यांनी ते कुठे आहेत याची चौकशी करण्यासाठी तांबे यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांचा फोन वेटिंगवर येत असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर तांबे यांनी रविवारी पहाटे चार वाजता मी तुम्हाला उद्या भेटतो, असा टेक्स्ट मेसेज सरोदे यांना केला. त्यानंतर मोबाईल चार्ज नसल्याने तो बंद झाला.

---

Web Title: Midnight funeral on the body of Assistant Police Inspector