शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

मारडा येथे मध्यरात्री सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 05:01 IST

मारडा येथे नीलेश रमेश साव यांचे  घर आहे.  त्यांचे कृषिसेवा केंद्र असून घरातील अन्य सदस्य व्यापारी आहेत. रविवारी सर्व जण घरात झोपले असताना रात्री १ च्या सुमारास अज्ञात पाच ते सहा जणांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, तर घरातील लोकांना तुम्ही झोपून राहा, असे हिंदीत दरडावले. नीवेश साव यांचे वडील व पत्नी यांच्यावर चाकू रोखून जिवे मारण्याची  धमकी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील मारडा गावात रविवारी रात्री १ वाजताच्या सुमारास एका घरात पाच ते सहा जणांनी धाडसी दरोडा टाकत चाकूच्या धाकावर १४ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी तातडीने घटनास्थळ गाठत अधिनस्थ यंत्रणेला तपासाचे निर्देश दिले. मारडा येथे नीलेश रमेश साव यांचे  घर आहे.  त्यांचे कृषिसेवा केंद्र असून घरातील अन्य सदस्य व्यापारी आहेत. रविवारी सर्व जण घरात झोपले असताना रात्री १ च्या सुमारास अज्ञात पाच ते सहा जणांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, तर घरातील लोकांना तुम्ही झोपून राहा, असे हिंदीत दरडावले. नीवेश साव यांचे वडील व पत्नी यांच्यावर चाकू रोखून जिवे मारण्याची  धमकी देण्यात आली. त्या दरोडेखोरांनी कपाटातील १० लाखांवर असलेले ४०३ ग्रॅॅम सोने, ८०० ग्रॅमची २० हजारांचे चांदीचे दागिने  व ३ लाख ५० हजार रोख असा एकूण १३ लाख  ८९ हजार ५००रुपयांचा ऐवज लंपास केला. काही चोरटे घरात, तर काही जण बाहेर लक्ष ठेवून होते, असे साव कुटुंबातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  जवळपास अर्धा तास हा थरार सुरू होता. घरातील सर्व सोने, चांदी व रक्कम लुटून सर्व आरोपी पसार झाले. लागलीच कुऱ्हा पोलिसांना फोनवरून माहिती देण्यात आली. कुऱ्हाचे पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे ताफ्यासह हजर झाले. श्वानपथकालादेखील पाचारण करण्यात आले. बयान नोंदविण्यात आली. त्यानंतर सोमवारी पहाटे अज्ञातांविरुद्ध भादंविचे कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हेसुद्धा रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे तिवसा तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सीसीटीव्हीचा आधारतिवसा, कुऱ्हा या भागातील ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी चोरी, दरोडा ठरला आहे. साव यांच्या घरात दरोडा पडला, १३.५० लाखांचा ऐवज लुटल्याची खबर सोमवारी सकाळी व्हायरल झाली. अनेकांनी साव यांचे घर गाठून घटनेचा कानोसा घेतला. पोलिसांनी कुऱ्हा-आर्वी मार्गालगतच्या सीसीटिव्ही फुटेजमधून काही सुगावा मिळतो काय, यावर नजर रोखली आहे. साव कुटुंबातील सदस्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार, हिस्ट्रीशिटर व रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची उलटतपासणी घेतली जात आहे.

दरोडेखोरांना पकडण्यासाठी नाकेबंदी करण्यात आली. तीन तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर दरोडेखोरांची ओळख पटेल, असा प्राथमिक अंदाज आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले जातील. - अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, अमरावती 

 

टॅग्स :RobberyचोरीThiefचोर