शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या रुपात भेटला सोकारी

By admin | Updated: January 11, 2017 00:02 IST

पोहरा-चिरोडी जंगलातील वाघाच्या मुक्त संचाराने इतर वन्यप्राणी भयभीत झाले असून ते सैरावरा होऊन आसरा शोधत आहेत.

वैभव बाबरेकर अमरावतीपोहरा-चिरोडी जंगलातील वाघाच्या मुक्त संचाराने इतर वन्यप्राणी भयभीत झाले असून ते सैरावरा होऊन आसरा शोधत आहेत. वाघाच्या आगमनाने वनविभाग अलर्ट असला तरी वाघाच्या आगमनामुळे पंचक्रोशीतील शेतकरी मात्र सुखावला आहे. वाघाच्या दबदब्यामुळे एरवी शेतीतील पिकांची नासधूस करणारे उपद्रवी वन्यपशू आता शेतांकडे फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे वाघाच्या रूपात एकप्रकारचा बेदरकार सोकारीच भेटल्याची सकारात्मक प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करीत आहेत. जीवांच्या अन्नसाखळीत वाघाचे सर्वोच्च स्थान आहे. त्याला जंगलाचा राजा असे संबोधले जाते. जंगलातील वन्यप्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे कार्य वाघ करतो. महाराष्ट्र राज्य वनविभागामार्फत सन २०१४-१५ मध्ये वाघांची विशिष्ट गणना करण्यात आली होती. त्यानुसार व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात एकूण २०३ वाघांचे अस्तित्व सिद्ध झाले. जिल्ह्यातील मेळघाटच्या समृद्ध जंगलातही वाघांचे वास्तव्य असून आता वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातही वाघांचा अधिवास आहे. वाघांच्या मुक्त संचारामुळे जंगलाशेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वाघांच्या दमदार एन्ट्रीमुळे शेतकरी मात्र सुखावले आहेत. वाघांपासून स्वत:चा बचाव करण्याकरिता इस्तत: पळालेले वन्यप्राणी आता शेतीपिकांचे नुकसान करण्यास शेतात शिरत नाहीत. त्यामुळे पीकहानी कमी झाली आहे. शेतकरी परिश्रमपूर्वक पेरणी करतात. मोठ्या जतनाने पिके वाढवितात. मात्र, हाताशी आलेले पीक वन्यपशू नेस्तनाबूत करीत असल्याने शेतकरी हैराण झाले होते. जंगलानजीकच्या शेतात निलगायी, हरीण, रानडुकरे, रोही आदींचा उपद्रव नेहमीचाच झाला होता. शेतकरीवर्ग निर्धास्त अमरावती : यामुळे शेतकऱ्यांना आजवर लाखोंचे नुकसान सोसावे लागले. मात्र, जेव्हापासून वाघाने या जंगलात मुक्काम ठोकला आहे तेव्हापासून अन्य वन्यपशुंनी शेतांकडे फिरकरणे बंदच केले आहे. परिणामी पिकांची हानी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जंगलाच्या राजाच्या बिनधास्त वावरामुळे अन्य वन्यपशू दबावात वावरत असून शेतकऱ्यांना मात्र निर्धास्त झोपण्याची संधी मिळाली आहे. याबाबीला वनविभागाने दुजोरा दिला.ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा श्वास वन्यपशुंचा उपद्रव झाला कमी जंगलात वाघाचा वावर असल्याने अन्य वन्यप्राणी सैरावैरा झाले आहेत. वाघाच्या भीतीपोटी ते सुरक्षीतस्थळी गेले आहेत. ही बाब शेतकऱ्यांच्या हिताची ठरत आहे. वाघाचा अधिवास सिद्ध झाल्यानंतर उपद्रवी वन्यप्राण्यांपासून होणार नुकसान कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. - यादव तरटे, वन्यजीव पे्रमी तथा पक्षीप्रेमी