शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ माथेफिरूने क्षणार्धात पुसले दोन माथ्यावरचे कुंकू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

फोटो पी १६ कुरळ पूर्णा सुमीत हरकुट चांदूर बाजार : काडीमोड घेतल्यानंतरही पत्नीला आणण्यास गेलेल्या माथेफिरूने क्षणार्धात दोन ...

फोटो पी १६ कुरळ पूर्णा

सुमीत हरकुट

चांदूर बाजार : काडीमोड घेतल्यानंतरही पत्नीला आणण्यास गेलेल्या माथेफिरूने क्षणार्धात दोन सवाष्णींना वैधव्य दिले. ध्यानीमनी नसताना सासू-सुनेच्या माथ्यावरचे कुंकू पुसले गेले. जावयाने सासरा व साळ्याला एकाच वेळी संपविल्याच्या या घटनेने कुरळ पूर्णा या छोट्याशा गावात स्मशानशांतता पसरली आहे. एकाच वेळी दोन कर्ते पुरुष गमावल्याने सासू-सून शून्यात हरविल्या आहेत. मीरा बंडू साबळे (४०) व वर्षा धनंजय साबळे (२२) असे अकस्मात वैधव्य पदरी आलेल्या सासू-सनेचे नाव आहे.

आरोपी रवि सुरेश पर्वतकार (२३, रा. महावीरनगर, अमरावती) या जावयाने १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास कुरळ पूर्णा गाठून सासरा बंडू साबळे व साळा धनंजय साबळे यांच्यावर चाकूने हल्ला करीत त्यांचा खून केला. या घटनेत बंडू साबळे यांचे वडील विश्वनाथ साबळेदेखील गंभीर जखमी आहेत. दरम्यान, आरोपी रवि पर्वतकर व त्याच्या पत्नीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. बुधवारी सकाळी पोलीस पथक त्यांना घेऊन चांदूर बाजारात पोहोचणार आहेत.

घटनेच्या दिवसापासून मृतकांच्या घर वजा झोपडीत भयावह शांतता पसरली आहे. दोन दिवसांपासून कुणाच्याही पोटात अन्नाचा कणही नाही. मृत धनंजयची पत्नी अंगणातील तुळशीजवळ शून्यात भान हरपून बसली आहे. मृत बंडू साबळे यांचा १९ वर्षीय धाकटा मुलगा हा आता कुटुंबाचा एकमेव आधारवड आहे. मात्र, तोही वडील व मोठ्या भावाच्या हत्येमुळे हादरला आहे. मृत बंडू साबळे यांची पत्नी मीरा साबळे यांचे धाय मोकलून रडणे कुणाकडूनही थांबविणे शक्य झालेले नाही. आरोपीला फाशी द्या, अशी एकच मागणी त्या करीत आहेत.

आरोपीकडून मुलीला बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असतानाच अडविण्याच्या प्रयत्नात त्याने तिघांवर अनपेक्षित चाकुहल्ला केला. तिघांच्याही शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी अंदाजे नऊ सेंटीमीटर खोल जखमा झाल्या. काही कळायच्या आतच साबळे कुटुंबातील तिन्ही कर्ते पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडले. आजही घटनास्थळी अनेक ठिकाणी रक्त सांडलेले दिसून येते. साबळे कुटुंब भांबावलेल्या अवस्थेत असतानाच आरोपी रवि चाकूच्या धाकावर मुलीला घेऊन पळाला. आरोपीच्या या कृत्याने एका कुटुंबाची वाताहत झाली.

------------

जड अंत:करणाने अंत्यसंस्कार

घरातून एकाच वेळी बाप-लेकाचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी निघाल्याचे डोंगराएवढे दु:ख कुटुंबीयांचे अश्रू सुकवून गेले आहे. धनंजयची दीड वर्षांची मुलगी तन्वी दोन दिवसांपासून बाबा न दिसल्यामुळे सारखी रडत आहे. बाबाला मोबाईल लाव, अशी आईला सुचवत आहे. बंडू साबळे यांचा १९ वर्षीय मुलगा या घटनेमुळे भेदरला. परिणमी, तो तापाने फणफणतो आहे.

फोन लोकेशनवरून गवसला आरोपी

आरोपी रवि पर्वतकर हा पत्नीला घेऊन लागलीच कुरळपुर्णा येथून पसार झाला. चांदूर बाजार पोलिसांनी याबाबत सायबर सेलला माहिती दिली. आरोपीचे फोन लोकेशन मिळविण्यास सायबर सेलला यश प्राप्त झाले. यानंतर पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याशी संपर्क साधला. सध्या आरोपी हा त्या महिलेसह पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांना चांदूर बाजारला आणण्यासाठी अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे येथे रवाना झाले आहे. तेथील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच आरोपी व युवतीस स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल.