शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
3
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
4
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
5
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
6
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
7
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
8
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
9
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
10
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
11
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
12
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
13
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
14
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
15
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
16
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
17
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
18
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
19
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
20
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती करणार माती, पाणी परीक्षण

By admin | Updated: May 11, 2014 22:45 IST

माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पध्दतीने शेती करणे आता कठीण झाले आहे. यामुळे उत्पन्नात घट होताना दिसत आहे.

गजानन मोहोड -

माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पध्दतीने शेती करणे आता कठीण झाले आहे. यामुळे उत्पन्नात घट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून माती, पाणी व पाने परीक्षण करुन शेतकर्‍याच्या मोबाईलवर एसएमएसव्दारे अहवाल देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील शेतकर्‍यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नवीन तंंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकर्‍यांना अधिक उत्पादन मिळावे, यासाठी शेतामधील मातीचे परीक्षण करुन त्यामध्ये कुठल्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एकाच वर्षात दोन ते तीन वेळा पीक घेतल्याने मातीचा पोत व आरोग्य बिघडते. जमिनीमधील क्षारांचे प्रमाण वाढते. परिणामी पिकाला आवश्यक पोषक तत्त्व न मिळाल्याने उत्पादनात घट येते. रासायनिक खतांच्या वापरामुळेसुध्दा जमिनीचा पोत खराब होतो. हे जाणून घेणे शेतकर्‍यांसाठी आवश्यक आहे. यासाठी माती परीक्षण अत्यावश्यक ठरते. त्यामुळे बाजार समितीने माती नमुने परीक्षणाचा निर्णय कृषी अनुसंधान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनात घेतला आहे. यासाठी बाजार समितीच्या पहिल्या माळ्यावर स्वतंत्र कक्ष आवश्यक उपकरणांसह सुसज्ज आहे. यामध्ये माती, पाणी, पानांची तपासणी, तेले, प्रथिने, आर्द्रतेचे प्रमाण, बियाणे तपासणी, उगवण क्षमता तपासणीची सोय आहे.