शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कन्यांद्वारे निर्मित लाखेच्या बांगड्यांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:23 IST

कुपोषणाचा कलंक पुसण्यासाठी आदिवासी माता व बालकांना पोषण आहार कसा दिला, .....

ठळक मुद्देमहिला वकिलांनी केली खरेदी : आदिवासींना लाभ वितरण, मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : कुपोषणाचा कलंक पुसण्यासाठी आदिवासी माता व बालकांना पोषण आहार कसा दिला, याची प्रत्यक्ष माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी जाणून घेतली.व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने आदिवासी मुलींनी तयार केलेल्या ‘लाखेच्या बांगड्या’देखील यावेळी चर्चेत राहिल्या.येथे राष्टÑीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबाबत मार्गदर्शन व लाभार्थ्यांना लाभ वितरण शिबिराचे आयोजन पालिका भवन येथे करण्यात आले होते.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एल. पानसरे, अचलपूर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.पी. पाटकर, विभागीय आयुक्त पीयूष सिंग, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, वकील संघाचे तरूण शेंडे, भोला चव्हाण, रवींद्र खोजरे, धर्मेंद्र यावले, सुवर्णा गवई, महिला न्यायाधीश पतिंगे उपस्थित होते.कार्यक्रमस्थळी बालविकास प्रकल्प कार्यालय, व्याघ्र प्रकल्प, पेसा कायदा, कृषी विभाग, बँक आदी महत्त्वाच्या कार्यालयांचे टॉल्स लागले होते. मेळघाटातील बालकांच्या कुपोषणासह दिला जाणाºया आहाराची माहिती न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी प्रत्यक्ष जाणून घेतली. ‘मणाक’चे कैलास घोडके, विलास दुर्गे, योगेश वानखडे, आशा निंबाळकर, सालेहा खान, शीला दहीकर, कमल पांडे, पडोने, कौसल्या विचलकर, राजा खंडारे उपस्थित होते.न्यायमूर्तींनी रोखीने खरेदी केले पापडपरतवाडा : न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी कार्यक्रमानंतर अंबिका लॉन येथे लावण्यात आलेल्या स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांना महिला बचत गटाने पापड भेट दिले. त्यांनी ते स्वीकारल्यावर त्यांनी त्याची किंमत विचारली. पण ही भेटवस्तू असे सांगितले. यावर मला भेटवस्तू नको, त्या पाकिटावर असलेली किंमत त्यांनी पाहिली व पूर्ण पैसे चुकविले. यावेळी उपस्थित असलेले वकिल व न्यायाधीशही आश्चर्यचकीत झाले.व्याघ्र प्रकल्पाच्या बांगड्या चर्चेतमेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने स्थानिकांना उपजीविका प्रशिक्षण देण्यात येते. हरिसाल येथे ७० युवक-युवतींना लाखेच्या बांगड्या, गाईड्स, आदरतिथ्य प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी लाखेच्या बांगड्यांचे टॉल्स येथे लावण्यात आले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण आवारे, प्रदीप बाळापुरे, पंजाब गवई यांनी प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. सुशीला धिकार व भुलई कास्देकर या दोन युवती लाखेच्या बांगड्या बनवीत होत्या.