लाचखोरांनी शोधली 'सुवर्ण भेटी'ची पळवाट

By Admin | Updated: December 18, 2014 00:12 IST2014-12-18T00:12:26+5:302014-12-18T00:12:26+5:30

या वर्षात अनेक लाचखोरांना रंगेहात पकडल्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे.

The loopholes searched for 'gold gift' | लाचखोरांनी शोधली 'सुवर्ण भेटी'ची पळवाट

लाचखोरांनी शोधली 'सुवर्ण भेटी'ची पळवाट

अमरावती : या वर्षात अनेक लाचखोरांना रंगेहात पकडल्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. शासकीय कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे, अंतर्गत चौकशी यासारख्या माध्यमातून लाचखोरी रोखण्याचे उपाय शासनाने योजिले आहेत. मात्र लाचखोरांनी लाच स्वीकारणे कमी न करता लाच स्वीकारण्याच्या नव्या वाटा शोधल्या आहेत. जसे रोख पैसे न घेता सुवर्ण अलंकार स्वीकारण्याचा नवा फंडा या लाचखोरांनी निवडला आहे. यामध्ये महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश आहे.
शासनाने भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. अनेक अधिकारी कर्मचारी या कारवाईमध्ये पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले जाते. अलीकडे अशा प्रकारात वाढ झाली आहे.
यामुळे लाचखोर अधिकारी व कर्मचारी अधिक सावध झाले आहे. त्यांनी आता रोख रक्कम स्वीकारण्याऐवजी परस्पर मोठ्या पेढीतून सुवर्ण अलंकार आणने पसंत केले आहे. ज्याचे काम करावयाचे आहे. त्याला सुवर्ण अलंकाराचे पैसे मागविण्याचे सांगितले जाते. या व्यवहारात कोणत्याही नोंदी किंवा पावती केल्या जात नाही. अशा लाचलुचपत अधिकारी, कर्मचाऱ्याला पकडणे लाचलुचपत खात्यासमोर नवे आव्हान आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने वाळुमाफिया व अवैध धंद्यामधील व्यक्ती व ओव्हरलोड ट्रकची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीव्दारा एजंटच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सुवर्ण अलंकार भेट देण्याची चर्चा जिल्ह्यात आहे. याचेच अनुकरण अन्य अधिकारी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The loopholes searched for 'gold gift'