शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मॅट्रिमोनी साईटवर स्थळ शोधताय? सावधान ! मी 'यूएस'ला डॉक्टर आहे सांगून महिलेला २.३५ लाखांना लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:07 IST

२.३५ लाखांना लुबाडले : महिलेची गाडगेनगर पोलिसांत धाव, न्युयार्कच्या तोतयाविरूद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोशल नेटवर्किंगसह आता मॅट्रिमोनी वेबसाईटवरही सायबर भामट्यांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच मॅट्रिमोनी साईटवरील ओळख येथील एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. एकाने आपण यूएसमध्ये डॉक्टर असून सध्या सीरियामध्ये असल्याची बतावणी केली. विश्वास निर्माण केला आणि त्यानंतर तिच्याकडून २ लाख ३५ हजार १३३ रुपये उकळले. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी ५ नोव्हेंबर रोजी एका तोतयाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. डॉ. सुनीत भुमर (३४, रा. न्यूयॉर्क, यूएसए) असे त्या तोतयाचे नाव आहे.

गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेने काही दिवसांपूर्वी एका मॅटिमोनी अॅपवर प्रोफाइल तयार केले. त्यानंतर तिला एका ३४ वर्षीय तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात डॉक्टर असल्याची बतावणी केली. तक्रारदार महिलेला समोरील व्यक्तीने स्वतःचे नाव डॉ. सुनीत असे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात सोशल मीडिया अकाउंटवरून चॅटिंग सुरू झाले होते. आपण यूएसएमध्ये डॉक्टर आहे, सध्या कंत्राटी पद्धतीने सीरिया या देशात काम करतो आहे. २७ ऑक्टोबरपर्यंत त्यांच्यात नियमितपणे चॅटिंग सुरू होते. त्या कालावधीत त्यांचा संवाद वाढला.

तो झाला 'नॉट रिचेबल'

आरोपीने सीरियामधून बाहेर निघताना कागदपत्रांसाठी आवश्यक १ लाख ३३ हजार १७८ रुपये मागितले, ती रक्कम तिने त्याला ट्रान्सफर केली. त्यानंतर काही रोख मला दाखवावी लागेल, असे सांगून त्याने महिलेकडे ५७ हजार ७८३ रुपये मागितले. महिलेने ती रक्कमसुद्धा त्याच्या खात्यात ट्रान्सफर केली. नंतर मात्र त्याच्यासोबत संपर्कच झाला नाही.

मी भारतात येतोय, माझ्या खात्यात ३८ कोटी रुपये

आपण भारतामध्ये येत आहोत. आपल्या भारतातील एका बँकेतील खात्यामध्ये ३८ कोटी रुपये आहे. त्यामुळे तू त्या खात्यामधून मला पाच लाख रुपये ट्रान्सफर करून दे, अशी बतावणी आरोपीने केली. त्यामुळे महिलेने त्याच्याच खात्यामधून त्याला पाच लाख रुपये ट्रान्सफर केले. त्या व्यवहारामुळे तिचा आरोपीवर विश्वास बसला.

English
हिंदी सारांश
Web Title : Matrimony Site Scam: Woman loses ₹2.35 Lakh to fake US doctor.

Web Summary : A woman was defrauded of ₹2.35 Lakh by someone posing as a US-based doctor on a matrimony site. The scammer, claiming to be working in Syria, gained her trust before requesting money for various false reasons. Gadge Nagar police have registered a case against the imposter.
टॅग्स :AmravatiअमरावतीWeddingशुभविवाहmarriageलग्नUSअमेरिका