शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एकाच पेल्यातून तळीरामांना दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:01 IST

गावबंदीचे फलक गावोगावी लागले. पण गावातील अथवा परिसरातील तळीरामाला जिल्ह्यात पहिल्यांदा बेदम चोप देण्यात येईल, अशी तंबी वजा इशारा मोझरी गावकऱ्यांनी दिला. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बियर बार, हॉटेल, देशी दारूची अधिकृत दुकाने बंद आहेत. त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळवला आहे. ग्रामीण भागात अवैध दारुची सर्रास विक्री होत आहे.

ठळक मुद्देसंसर्गाची नाही भीती : चोप देण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज (मोझरी) : नशेसाठी वाट्टेल ते किमत चुकविण्यासाठी आज नशाबहाद्दर तयार आहे. त्याचे जिवंत उदाहरण अमरावती, यवतमाळमधील नागपुरी खर्रा. त्यापाठोपाठ आता गावठी दारूची नशा चढू लागली आहे. गावठी दारू देण्यासाठी विक्रेत्यांकडून एकाच ग्लासचा वापर होताना दिसत. त्यामुळे संसर्गाची भीती वाढली आहे. नशेबहाद्दर गाववस्तीत शिवराळ भाषा वापरतात. ग्रामस्थांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.गावबंदीचे फलक गावोगावी लागले. पण गावातील अथवा परिसरातील तळीरामाला जिल्ह्यात पहिल्यांदा बेदम चोप देण्यात येईल, अशी तंबी वजा इशारा मोझरी गावकऱ्यांनी दिला. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बियर बार, हॉटेल, देशी दारूची अधिकृत दुकाने बंद आहेत. त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळवला आहे. ग्रामीण भागात अवैध दारुची सर्रास विक्री होत आहे. अनेक दारूचे दुकान बंद असल्याने मोझरीत दारू पिणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता आंबेडकरनगरात रस्ता बंद करून तळीरामांना इशारा देणारे फलक लावले आहे. कोणी व्यक्ती दारू पिण्यास व अकारण फिरताना दिसल्यास त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, असा इशारा या बॅनरच्या माध्यमातून गावकऱ्यांनी दिला जात आहे.फलक लक्षवेधीलॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील अनेक गावांत बाहेर गावातील लोकांना गावबंदी, असे फलक लावण्यात आले आहे. मोझरीत मात्र तळीरामांच्या रोजच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी असे फलक लावले आहे. त्यामुळे या बॅनरची चर्चा जिल्ह्याभरात होत आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी