एक पत्र मराठा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST2021-06-18T04:10:21+5:302021-06-18T04:10:21+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ‘एक पत्र मराठा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या अभियानांतर्गत १ कोटी पत्र देशाचे ...

A letter for the bright future of the Maratha community | एक पत्र मराठा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी

एक पत्र मराठा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ‘एक पत्र मराठा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या अभियानांतर्गत १ कोटी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहेत. युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने एक पत्र लिहावे. ही मोहीम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने वरुड येथेसुद्धा राबविण्यात आली. यावेळी स्थानिक डाकघरातील पत्रपेटीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाकरिता पत्र लिहून टाकले. यावेळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष हर्षल गलबले, जिल्हा संघटक सूरज वडस्कर, जिल्हा उपाध्यक्ष आशीष श्रीराव, शहर युवक अध्यक्ष मोहसीन मिर्झा, तालुका सचिव संकेत घोरमाडे, तालुका अध्यक्ष पदवीधर गौरव देशमुख, तालुका कोषाध्यक्ष शुभम पावडे, अनुज वडस्कर, वसंत घोरमाडे, नीलेश खोडसकर, कौसिफ भाई, ओंकार सातपुते, पुष्पक देशमुख, तेजस देशमुख, अमोल चोबितकर, अंकुश बरांगे, शुभम सोनारे, अबुल साहिद, शुभम पांडे, जुनेर पठान, शुभम पाचघरेसह शेकडो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: A letter for the bright future of the Maratha community