शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रुपात एलबीटी कायम?

By admin | Updated: March 10, 2015 00:32 IST

राज्यात भाजपचे शासन आल्यास व्यापाऱ्यांंना स्थानिक स्वराज्य संस्था करमुक्त (एलबीटी)

३० मार्चपर्यंत वसुलीचे निर्देश : ५० कोटींच्या उलाढालीवर करअमरावती : राज्यात भाजपचे शासन आल्यास व्यापाऱ्यांंना स्थानिक स्वराज्य संस्था करमुक्त (एलबीटी) करु, अशी घोषणा निवडणुकीच्या काळात केली होती. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ एप्रिलपासून एलबीटी संपणार, असे जाहीर केले आहे. मात्र, तूर्तास एलबीटी हटविणे शक्य नसल्याने हा कर काही काळ कायम ठेवून पुन्हा नव्या रुपात आणण्याची तयारी शासनकर्त्यांनी केली आहे.ज्या व्यापारी प्रतिष्ठानांची उलाढाल ५० कोटींपेक्षा अधिक आहे, अशा व्यावसायिकांकडून एलबीटी वसूल करण्याचे धोरण राज्य शासनाने तयार केले आहे. त्या अनुषंगाने मंत्रालयात हालचालींना वेग आला आहे.एलबीटीऐवजी जीएसटी ही नवी कर प्रणाली लागू करण्याची रणनीती भाजपचे नेते आखत आहेत. मात्र, राज्यातून एलबीटी हटविल्यास महापालिकांना अनुदान कसे देणार? हा प्रश्न शासनकर्त्यांना सतावतो आहे. त्यामुळे जीएसटी ही कर प्रणाली लागू होईपर्यंत एलबीटी कायम ठेवण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, ५० कोटींच्यावर उलाढाल असलेल्या प्रतिष्ठानांकडून एलबीटी वसूल करण्याची शक्कल लढविली जात आहे. त्याअनुषंगाने विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थखात्याने नव्या रुपात एलबीटी कर सुरु ठेवण्याची तयारी चालविली आहे. जीएसटी प्रणालीचा प्रारुप आराखडा तयार होईपर्यंत व्यापाऱ्यांनी एलबीटी भरुन स्थानिक स्वराज्य संस्थाना सहकार्य करण्याचे आवाहन अर्थमंत्री स्वत: करणार असल्याची माहिती आहे. राज्यातील ५० कोटींच्यावर उलाढाल असलेल्या प्रतिष्ठानांची यादी अर्थखात्याने मागविली आहे. अमरावतीत केवळ चार व्यावसायिकांची उलाढाल ५० कोटींच्यावर असल्याचे या यादीवरून स्पष्ट होते. अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली निश्चित होईल. शासनाच्या निर्णयानुसार कर प्रणाली लागू करु. एलबीटीबाबत काहीही माहिती नाही. -अरुण डोंगरे,आयुक्त, महापालिका.