शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

पतीशी भेट शेवटची; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 14:00 IST

Amravati : अमरावतीच्या भीषण अपघातात मृतांच्या ३ महिलांमध्ये पल्लवी सुद्धा एक

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सेमाडोहनजीक नाल्यात खासगी बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये डॉ पल्लवी कदम (३२) यांचाही मृत्यू झाला. त्यांचा यंदा ११ जुलैला एमआयडीसी परिसरातील रहिवासी राहुल इंगोले यांच्याशी विवाह झाला. आठ दिवसांपूर्वीच या दाम्पत्याला पल्लवी गर्भवती असल्याची गोड वार्तादेखील समजली होती. त्यामुळे कदम आणि इंगोले हे दोन्ही कुटुंबीय आनंदात रममाण झाले होते. परंतु, अपघाताने तो आनंद आणि पल्लवी यांनादेखील हिरावून नेले. 

डॉ. पल्लवी कदम या मेळघाटातील चिचघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील दोन वर्षांपासून समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. मूळच्या आष्टी (ता. वर्धा) येथील त्या रहिवासी. लग्नापूर्वी त्या चिचघाट येथे राहून आरोग्य सेवा देत होत्या. मात्र, विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांनी अमरावती ते चिचघाट असा रोजचा प्रवास सुरू केला. कर्तव्यावर पोहोचण्यासाठी त्या पहाटे ५ वाजताच्या खासगी बसने नेहमीच प्रवास करीत होत्या. 

आठ दिवसांपूर्वीच पल्लवी आणि राहुल या दाम्पत्याच्या जीवनवेलीची कळी खुलल्याची गोड वातदिखील त्यांना समजली होती. सोमवारी राहुल त्यांना खासगी ट्रॅव्हल्सवर सोडले. त्यातेली स्मिताम्य करीत त्यांनी पतीला निरोप दिला. ती त्यांची अखेरची भेट ठरली. डॉ. पल्लवी यांचा मृतदेह सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान शवविच्छेदनानंतर घरी आणण्यात आला. त्यांच्यावर शहरातील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शिक्षकाला हलविले नागपूरला ट्रॅव्हल्समधून एकूण सात शिक्षक मेळघाटात कर्तव्यावर निघाले होते. यातील नारायण पुरी नामक शिक्षकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले आहे. एका शिक्षकावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात, तर एका महिला शिक्षिकेवर अमरावतीला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या शिक्षिकेच्या डोक्याला जबर मार लागला आहे.

पाच वर्षांची चिमुकली अन् आईचीही प्रकृती गंभीर गायत्री मावस्कर या पाच वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्याला मार लागल्याने ती गंभीर आहे. तिला सुरुवातीला नागपूर रेफर करण्याचे सांगण्यात आले होते. या चिमुकलीसह तिची आई काली मावस्करही गंभीर जखमी आहे.

तीन महिन्यांपूर्वीही उलटली होती बस या मार्गावर सतत अपघात घडत असतो. विशेष म्हणजे, याच चावला कंपनीची बस तीन महिन्यांपूर्वी घटांग गावाजवळ वळणावर उलटली होती. त्यावेळी जीवितहानी झाली नाही

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघात