शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

हायब्रीड अ‍ॅन्युईटीच्या कामांना निधीअभावी ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 5:00 AM

काही रस्त्यांची कामे वेगाने पूर्णत्वास गेली. मात्र, लॉकडाऊनमध्ये साडेतीन महिने कामे बंद होती. उन्हाळ्यात जी कामे व्हायला हवी होती ती झाली नाही. मार्गावरील अनेक पुलांचे कामे प्रलंबित आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून ठेवल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यात पावसाचे पाणी साचले आहे.

ठळक मुद्दे१४७ किमीची कामे अद्यापही प्रलंबित : लॉकडाऊनमुळे कामांना विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : '६० टक्के निधी शासनाचा ४० टक्के गुंतवणूक कंत्राटदारांची' या तत्त्वावर जिल्ह्यात हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत १० विविध मार्गांची कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये ४१२ पैकी २६५ किमीची कामे पूर्णत्वास गेली असून, अद्यापही १४७ किमीची रस्त्याची कामे प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर कामांना निधीअभावी कंत्राटदाराने ब्रेक लावला असल्याचे बोलल्या जात आहे.१४७ किमीच्या कामांमध्ये आसरा- दर्यापूर, वलगाव दर्यापूर, परतवाडा-घटांग व इतर काही रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सदर १० मार्गाच्या विकासकामांची १४६० कोटींची निविदा असून, सदर काम हे मुंबई येथील एका कंपनीला मिळाले आहे. सुरुवातीला काही रस्त्यांची कामे वेगाने पूर्णत्वास गेली. मात्र, लॉकडाऊनमध्ये साडेतीन महिने कामे बंद होती. उन्हाळ्यात जी कामे व्हायला हवी होती ती झाली नाही. मार्गावरील अनेक पुलांचे कामे प्रलंबित आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून ठेवल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यात पावसाचे पाणी साचले आहे. आसरा-दर्यापूर, खोलापूर दर्यापूर मार्गावर गिट्टी टाकल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वेलकम पॉईंट ते बियाणीपर्यंतच्या मार्गाचे कामे करण्यात येत आहे.दर्यापूर-अंजनगाव, दर्यापूर- मूर्तिजापूर, दर्यापूर-म्हैसांग अकोला, वलगांव- खोलापूर तसेच अमरावती- चांदूररेल्वे धामणगाव व इतर मार्गाचे कामे पूर्णत्वास गेले आहे तर काही ठिकाणी काही किमीची कामे प्रलंबित आहेत. मार्डी-कुºहा-कौंडण्यपूर मार्गाचे काम झाले आहे. तसेच उर्वरित रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत.२३० कोटींची नव्याने मागणीहायब्रीड अ‍ॅन्युईटीची कामे करण्याकरिता आतापर्यंत ५०० कोटींचा निधी प्राप्त झाला असून, सदर कामांवर खर्च झाला आहे. नव्याने २३० कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.घटांग मार्गाला वनविभागाचा खोडापरतवाडा-चिखलदार-घटांग मार्ग हा काही किमीपर्यंत वनविभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या मार्गावर विकासात्मक कामे सुरू करण्यातस बांधकाम विभागाला अडचणी निर्माण झाल्या आहेत. वनविभागाच्या क्षेत्रातून रस्त्याची कामे परवानगीकरिता बांधकाम विभागाने वनविभागाशी पत्रव्यवहार केला आहे. पण अद्यापही यश आले नाही. जे क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारित येत नाही, त्या भागात रस्त्यांची कामे करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.खोदकाम करून अर्धवट ठेवली कामेखोलापूर ते दर्यापूर दरम्यान रस्त्याचे काही किमीचे कामे करण्याकरिता रस्त्याच्या कडेला खोदकाम केले आहे. तसेच दर्यापूर शहरातही अमरावती मार्गावर खोदकाम करून कामे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.लॉकडाऊनमुळे कामे बंद होती. मात्र, आता कामे सुरू झाली आहेत. शासनाकडे नव्याने २३० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. २६५ किमीची कामे पूर्ण झालेली आहेत.- अरुधंती शर्माअधीक्षक अभियंता अमरावती

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा