शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कुल्फी विक्रेत्याची हत्या की आत्महत्या ?

By admin | Updated: June 5, 2015 00:39 IST

नजीकच्या शहापूर येथे कुटुंबासह ३० वर्षीय युवक कुल्फी विकण्याकरिता उत्तरप्रदेशातून आला होता.

चर्चेला ऊत : पत्नीसोबत झाला होता वादवरुड : नजीकच्या शहापूर येथे कुटुंबासह ३० वर्षीय युवक कुल्फी विकण्याकरिता उत्तरप्रदेशातून आला होता. मंगळवारी दिवसभर व्यवसाय करुन सायंकाळी ६ वाजता घरी आल्यांनतर पत्नीसोबत त्याचे भांडण झाल्याचे सांगण्यात येते. मात्र सकाळी युवकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. यामुळे या युवकाची हत्या की, आत्महत्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. प्राप्त माहितीनुसार, अरविंदकुमार राजाराम कुमार (३०, रा.रामपुरा (नेवाडा उत्तरप्रदेश) असे आहे. मृत हा दरवर्षी वरुड तालुक्यात कुल्फी विकण्याकरिता येत होता. यावर्षीसुध्दा पत्नी आणि दोन मुलीसह शहरापूर येथे येऊन कुल्फी विकण्याचे काम करीत होता. मंगळवारी सायंकाळी ६ वाजतादरम्यान कुल्फी विकून घरी आला तेव्हा तो दारुच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. यामुळे पत्नीसोबत भांडण झाले. यानंतर रात्री ११ वाजताच्या दरम्यान तो घरी असल्याचे पत्नी पाहिले होते. परंतु सकाळी ७ वाजता पत्नीला तो खिडकीला दुपट्टा बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पत्नीने आरडाओरड करुन शेजारी तसेच मृताचे चुलतभावांना बोलावून गळफास काढला असता त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र मृत अरविंदच्या गळ्यावर जखमा आढळल्याने कुणी त्याला मारुन गळफास लावला असावा, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती वरुड पोलिसांना दिल्यावरुन घटनास्थळावर ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र मस्कर, शिवपाल दाबेराव, शेषराव कोकरे, देशमुख यांनी जाऊन घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील तपास केला जाणार असल्याचे समजते. पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)