शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत शिवसेना ठरणार ‘किंगमेकर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांचा बोनस कालावधी शासनाने दिला.

ठळक मुद्देअपेक्षित बहुमताचा आकडा गाठण्यासाठी धडपड : सत्तेच्या बेरजेचे आराखडे बांधणे सुरू

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात एकीकडे भाजप, शिवसेनेत सत्तास्थापनेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तोच कित्ता अमरावती जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या पदाधिकारी निवड प्रक्रियेत गिरवला जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात रंगत आहे. येथे शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत आहे.जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांचा बोनस कालावधी शासनाने दिला. आता पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या १५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात काढण्यात येणार आहे. त्यावेळी अध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या प्रवगार्साठी निघणार, हे निश्चित होणार आहे.आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषदेच्या राजकारणात वेगवान घडामोडी होण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेतील दोन सदस्य हे विधानसभेत पोहोचले. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसचे संख्याबळ घटले आहे. जिल्हा परिषद सभागृहाची सदस्यसंख्या ५९ एवढी आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस २६, राष्ट्रवादी काँग्रेस २, रिपाइं १ आणि शिवसेना ३ असे ३२ सदस्यांच्या बळावर काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता आहे.दरम्यान, दर्यापूर तालुक्यातील गायवाडी सर्कलचे सदस्य तथा रिपाइंचे काँग्रेस समर्थित विद्यमान वित्त व आरोग्य सभापती बळवंत वानखडे आणि वरूड तालुक्यातील बेनोडा सर्कलचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य देवेंद्र भुयार हे दोन जिल्हा परिषदेचे सदस्य नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवङणूकीत विजयी झाले. त्यामुळे या दोन्ही पदाधिकाºयांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचे राजीनामे प्रशासनाकडे दिले. त्यामुळे ५९ सदस्यीय जिल्हा परिषदेत आता ५७ सदस्य आहेत. सताधारी पक्षासोबत आतापर्यंत ३२ सदस्य होते. त्यांच्या विधानसभेत जाण्याने काँग्रेसकडे केवळ स्वपक्षीय २६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ असे २८ एवढेच संख्याबळ राहते. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी होण्याची शक्यता असल्याने दोन रिक्त जागांवर पोटनिवडणुकीच्या निकालावर पुढच्या सत्तासोपानाचा मार्ग निश्चित होणार आहे. शिवसेनेने यावेळी जर काँग्रेसची साथ कायम ठेवली, तर सध्या असलेली काँग्रेसची सत्ता कायम राहू शकते.एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे काँग्रेसकडील सत्ता काबीज करण्यासाठी भाजप व अन्य विरोधी पक्ष मिळून सत्तास्थापनेची गणिते जुळविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, यासाठीही शिवसेना सोबत असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याशिवाय विरोधकांच्या हातात झेडपीची सत्ता जाऊ शकणार नसल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. एकंदर जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत शिवसेनेच्या तीन सदस्यांची भूमिका राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात होत आहे.लक्ष पोट निवडणुकीकडेजिल्हा परिषदेतील दोन पदाधिकारी विधानसभेवर निवडृून गेले आहेत. त्यामुळे बळवंत वानखडे यांचे गायवाडी आणि देवेंद्र भुयार यांचे बेनोडा जिल्हा परिषद सर्कल रिक्त झाले आहे. येथे डिसेंबर महिन्या पोटनिवडणूक झाल्यास, त्याच्या निकालावरही झेडपीच्या सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे.पक्षीय बलाबलकाँग्रेस २६, भाजप १३, प्रहार ०५, शिवसेना ०३, राष्टÑवादी काँग्रेस ५, लढा १, युवा स्वाभिमान २, अपक्ष १, स्वाभिमानी शेतकरी १, रिपाइं १, बसपा १; एकूण ५९

टॅग्स :zpजिल्हा परिषद