शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाची पैसेवारी ४६ पैसे

By admin | Updated: November 15, 2014 22:36 IST

जिल्ह्यात २०१४-१५ या खरीप वर्षाकरिता पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार १५ नोव्हेंबरला निश्चित केली. ही पैसेवारी ४६ पैसे म्हणजे पन्नास पैशांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील

जिल्हा दुष्काळाच्या छायेत : शेतकऱ्यांना मदत, सवलती मिळण्याचा मार्ग मोकळागजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यात २०१४-१५ या खरीप वर्षाकरिता पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार १५ नोव्हेंबरला निश्चित केली. ही पैसेवारी ४६ पैसे म्हणजे पन्नास पैशांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून सोयी-सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.१४ तहसीलदारांकडून आलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ३० सप्टेंबरला नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली. ती ६० पैशांच्या आसपास होती. त्यानंतर सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली. सुधारित पैसेवारी निश्चितलागवडीयोग्य असणाऱ्या १,९८१ गावातील नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक होती. वास्तविक यावर्षी दीड महिना उशिरा पाऊस, निकृष्ट बियाणे, पावसात खंड, दुबार पेरणी यामुळे मूग व उडीद बाद झाले. सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपाचे पीक हातून गेले, रबीसाठी जमिनीत आर्द्रता नाही, शेतकरी आर्थिक संकटात असताना नजर अंदाज आकडेवारी ५० टक्क्यांवर आल्याने शेतकरी संभ्रमात होता. मात्र प्रत्यक्ष पीक कापणीच्या आधारे, खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीचे अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील १४ तहसीलदारांकडून प्राप्त अहवालाच्या आधारे खरीप पिकाची सुधारित पैसेवारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा व धारणी या १४ ही तालुक्यांमधील लागवडीयोग्य ११८१ गावांमधील खरीप पिकांची सुधारित आणेवारी ५० पैशांच्या आत म्हणजे ४६ पैसे निश्चित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदत, सवलती मिळण्याचा मार्ग खुला आहे.अशी आहे नजरअंदाज पैसेवारीपिकांची प्रत्यक्ष नजरेने पाहणी करुन प्रथम नजरअंदाज पैसेवारी काढण्यात येते. यासाठी सर्व प्रकाराच्या जमिनीवरील पिकांच्या पाहणीसाठी प्रत्येक गावात प्रमुख पिकांचे १२ भूखंड निवडले जातात. या पैसेवारीनंतर कोणत्याही कारणाने पिकाच्या उत्पादन स्थितीत बदल झाल्यास सुधारित पैसेवारी काढण्यात येते. यावर्षी ही पैसेवारी ४६ पैसे आहे. शेतकऱ्यांना मिळणार मदत, सवलतपैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदत व सवलतींचा लाभ दिला जातो. त्या अनुशंगाने जिल्ह्यातील खरिप पिकाची सुधारीत पैसेवारी ४६ पैसे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत व सवलतीचा मार्ग मोकळा झाला आहे.