शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

काळे, मार्डीकर यांच्यात गटनेतेपदाचा वाद कायम

By admin | Updated: October 30, 2014 22:44 IST

महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतेपदाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गटनेतेपदी अविनाश मार्डीकर की सुनील काळे? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

अमरावती : महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतेपदाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गटनेतेपदी अविनाश मार्डीकर की सुनील काळे? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र, याप्रकरणी प्रशासनाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी एस.एस. कदम या वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटची सत्ता आहे. काँग्रेसकडे ३० तर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट यांच्याकडे २३ सदस्य संख्या आहे. समान पदे वाटपावर काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्तेची सूत्रे स्वीकारली. मात्र, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. संजय खोडके यांच्या नेतृत्वातील २३ सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमधून ७ सदस्य राष्ट्रवादी सोबत गेलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याच काळात सुनील काळे यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी नियुक्ती केली. त्यांतर हा वाद विभागीय आयुक्तांकडे पोहोचला. तत्कालीन विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांनी काळे यांची गटनेतेपदी वर्णी लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची महापालिकेत अंमलबजावणी करण्यासाठी थेट मंत्रालयातून सूत्रे हलली. अखेर महापालिकेच्या आमसभेत गदारोळात काळे यांच्या नावावर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, अविनाश मार्डिकर यांनी विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. अखेर उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांनी काळे यांची गटनेतेपदी केलेली नियुक्ती रद्दबातल ठरवून अविनाश मार्डीकर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय दिला. आता गटनेतेपदाचा वाद हा सुनील काळे किंवा अविनाश मार्डीकर यांच्या पुरताच सिमित राहिलेला नसून ही न्यायालयीन लढाई आ. रवी राणाविरुद्ध संजय खोडके अशी झाली आहे. त्यानंतर सुनील काळे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने काळे यांची याचिका दाखल करुन घेताना उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. आता गटनेतेपदाचा निर्णय नोव्हेंबरमध्ये होण्याचे संकेत आहेत.