ज्योत्स्ना दर्डा यांना सखींची स्वरांजली

By Admin | Updated: March 25, 2015 00:14 IST2015-03-25T00:14:07+5:302015-03-25T00:14:07+5:30

लोकमत सखी मंचच्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांच्या व्दितीय स्मृती दिनानिमित्त सोमवारी सायंकाळी येथील सखींच्या वतीने शानदार स्वरांजली अर्पण करण्यात आली.

Jyotsna Darda received Sakshi's Swarajali | ज्योत्स्ना दर्डा यांना सखींची स्वरांजली

ज्योत्स्ना दर्डा यांना सखींची स्वरांजली

अमरावती : लोकमत सखी मंचच्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांच्या व्दितीय स्मृती दिनानिमित्त सोमवारी सायंकाळी येथील सखींच्या वतीने शानदार स्वरांजली अर्पण करण्यात आली. नागपूर येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे गायकांनी या संगितमय कार्यक्रमात हृदयस्पर्शी सादरीकरण केले.
हे राम, तुही माता तुही पिता है, ओ पालन हारे, अल्लाह तेरो नाम, वैष्णव जन तो, ह्यासारख्या भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या गाण्यांनी वाहिलेली आदरांजलीने आगळी खुमारी निर्माण केली. आशय घाडगे, सावनी वखारकर, सेबी जेम्स यांनी सुरेख आवाजात गीत सादरीकरण केले. निवेदन अनुजा घाडगे, संगीत संयोजक पंकज सिंग यांनी केले. कार्यक्रम जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीच्यावतीने सादर करण्यात आला. १२ वर्षांपासून सखी मंचलाला सोबत करणाऱ्या सखींच्या हस्ते कार्यक्रमाचे द्वीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यामध्ये कुसुम रोडे, नलिनी थोरात, जयश्री पाबळे, अर्चना इंगोले व रंजना वाघ यांचा समावेश होता. अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Web Title: Jyotsna Darda received Sakshi's Swarajali