शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

बस जागेवरच; इंजिन लाॅक झाले तर काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:01 IST

दसरा-दिवाळी सणापासून प्रवाशांची संख्या वाढू लागली. मात्र, विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अमरावती विभागात गत तीन आठवड्यांपासून एसटी  बस गाड्या बंद  आहेत. परिणामी तीन आठवड्यांपासून  बस आगारातच  थांबल्या आहेत. सर्व एकाच जागेवर आगारात उभी असल्याने टायर खराब तसेच एअर बॉक्स खराब होण्याचा धोका वाढला आहे. बॅटरी डाऊन होत आहेत. अनेक समस्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटीचासंप अजूनही पूर्ण मिटलेला नाही. २८१  कर्मचारी कामावर आले असले तरी अमरावती विभागात बस जवळपास तीन आठवड्यांपासून जागीच उभ्या आहेत. त्यामुळे ऑईल गोठून इंजिन लॉक   आणि टायर खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दसरा-दिवाळी सणापासून प्रवाशांची संख्या वाढू लागली. मात्र, विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अमरावती विभागात गत तीन आठवड्यांपासून एसटी  बस गाड्या बंद  आहेत. परिणामी तीन आठवड्यांपासून  बस आगारातच  थांबल्या आहेत. सर्व एकाच जागेवर आगारात उभी असल्याने टायर खराब तसेच एअर बॉक्स खराब होण्याचा धोका वाढला आहे. बॅटरी डाऊन होत आहेत. अनेक समस्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.केवळ २८१ कर्मचारी कामावर- एसटीच्या अमरावती विभागात २४४६ कर्मचारी आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ २८१ कर्मचारी कामावर हजर झाले तसेच इतर कर्मचारी संपात सहभागी आहेत, हे सर्व कर्मचारी मागणीवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात सहा फेऱ्या परिवहन मंत्र्यांकडून वेतनवाढ जाहीर करण्यात आली.  यानंतर २४४६ पैकी केवळ २८१  कर्मचारी  रुजू झाले  आहेत, तर २ हजार १६२ कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. कामावर न परतल्यास पुनर्विचार करण्याचा इशारा दिल्यानंतरही २८१ कर्मचारी कामावर परतले. या कर्मचाऱ्यांमध्ये चालक-वाहकांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे आजमितीस केवळ सहा फेऱ्याच सोडण्यात येत आहेत.

मेंटेनन्सवर होणार लाखोंचा खर्च

जिल्ह्यातील बस आगारात थांबून आहेत. त्यातील बहुतांश गाड्यांच्या बॅटरीही बंद  पडण्याची भीती आहे, तर  टायर खराब होण्याच्या ही समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, बस उभ्या असल्या तरी दररोज गाड्यांचे देखभाल व चालू बंद केली जात आहे. तूर्तास गाड्यांची स्थिती चांगली असल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.

३६० जणांवर कारवाई- संपकरी एसटी कर्मचारी कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. - गत काही दिवसांमध्ये ३०६ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.- यामध्ये एसटी चालक-वाहक व आगारातील अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.- आतापर्यंत ३६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप