शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

बस पुलाखाली कोसळली

By admin | Updated: January 5, 2016 00:13 IST

परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील घटांग नजीक एस.टी. बस पुलाखाली कोसळली या अपघातात चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

चार गंभीर : १५ जखमी, घटांगनजीकची घटनाचिखलदरा : परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील घटांग नजीक एस.टी. बस पुलाखाली कोसळली या अपघातात चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अन्य १५ प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्यात. सोमवारी दुपारी २ वाजताचे सुमारास एमएच ४०-८१४२ या परतवाडा आगाराचे बसला हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना चिखलदरा व अचलपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.परतवाडा आगाराची ही बस चिखलदरा मार्गे चुरणीकडे जात असतांना या बसचे एक्सल तुटल्याने बस १५ फूट खोल पुलाखाली जाऊन कोसळली. यात भीमराव वांगे (१८ मोशी), मुनीया हरसुळे (१८ जाभली), मोतीराम दहिकर (२८ सलीता), शिवचरण चंदेले वाहक परतवाडा, रतन भामरे (७० माखला) अशोक मावस्कर (५० शिजगाव) उमेश तोटे (सलिता), अशोक कासस्देकर (सलिता) मुन्नीबाई नारायण येवले (मसोडी), फुला यवेले (सलोना) विशाल येवले आदीचा जखमी मध्ये समावेश आहे. या बसमध्ये २१ प्रवाशी होते. अशोक मनघटे, अशोक कासस्देकर, मुन्नीबाई येवले , मुनिया हरसुले या चार रूग्णाना गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रूग्णालयात येथे हलविण्यात आले आहे. तर अन्य प्रवाशांना परतवाडा येथील खासगी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)रग्णवाहिका बेपत्ता अचलपूर उपजिल्हा रूग्णालात गंभिर रूग्णांना अन्य ठिकाणी उपचारासाठी पाठविण्या करिता रूग्णवाहिका नसल्याची गंभिर बाब आजच्या अपघाताने उघडीअ आली आहे.केवलराम काळे यांनी अचलपूरचे तहसिलदार मनोज लोणाकर यांच्याशी संपर्क साधून खाजगी रूग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यानंतर चार गंभिर रूग्णांना अमरावतीत पाठविण्यात आले.माजी आमदार केवलराम काळे मदतीला धावलेमेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे यांना अपघाताची माहिती होताच ते तात्काळ घटनास्थळावर पोहचले व त्यांनी अपघात ग्रस्तांना मदतीचा हात दिला.