शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूरच्या परकोटाचे दरवाजे बंद करणे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:12 IST

हात लावायलाही पुरातत्त्व विभागाची अनुमती आवश्यक, संरक्षित स्मारक म्हणून घोषित अनिल कडू परतवाडा : अचलपूर शहराच्या परकोटाचे दरवाजे बंद ...

हात लावायलाही पुरातत्त्व विभागाची अनुमती आवश्यक, संरक्षित स्मारक

म्हणून घोषित

अनिल कडू

परतवाडा : अचलपूर शहराच्या परकोटाचे दरवाजे बंद करणे धोकादायक असून, त्यास हात लावायला केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची अनुमती आवश्यक ठरते. विभागाने या ऐतिहासिक व प्राचीन परकोट आणि दरवाजांना राष्ट्रीय महत्त्वाचे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या अनुषंगाने परकोटाचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला गेला. यात खिडकी गेट बंद केले गेले, तर दुल्हा गेट बंद करण्याचा प्रयत्न झाला. खिडकी गेट एक ते दीड तासांतच उघडले गेले. या प्राचीन वास्तूंची बरीच पडझड झाली आहे. काही भाग जीर्ण झाला. त्याचा कुठला भाग पडेल, याच्या नेम उरलेला नाही. त्यामुळे हे दरवाजे बंद करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे होय.

पुरातत्व विभागाकडून या परिसरात फलक लावले गेले आहेत. लक्षवेधक अशा या फलकांवर हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांत सूचना देण्यात आल्या आहेत.

२०० मीटरपर्यंतच्या विनियमित क्षेत्रात परवानगी न घेता केलेले कार्य नियमाचे उल्लंघन असून, त्यासाठी दोन वर्षांपर्यंत कैद तसेच एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद असल्याचे फलकावर नमूद आहे.

दरम्यान, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाकडे महत्त्वपूर्ण मार्ग या दरवाजातूनच पुढे जातो. केवळ हे दरवाजे बंद करून आज अचलपूर शहर बंद होऊ शकत नाही परकोटाच्या भिंतीला अनेक ठिकाणी भगदाड पडले असून, त्यातूनही लोकांचे अवागमन सुरू राहते. परतवाडा शहरातील खासगी दवाखान्यात औषधोपचारासाठी जाण्यासही हेच दरवाजे, रस्ते महत्त्वपूर्ण ठरत असल्याने नागरिकांचा या कृतीला विरोध आहे.

----------------------

अचलपूर शहरातील पराकोटाचे दरवाजे पोलिसांनी बंद केले असावेत. तेच याविषयी माहिती देऊ शकतील.

- मदन जाधव तहसीलदार अचलपूर

-------------

पराकोटाचे दरवाजे बंद करण्यास परवानगी दिलेली नाही. पण, त्याची दुरवस्था बघता पुरातत्त्व विभागाला सोबत घेऊन दुरुस्ती करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी संमती दिली आहे.

- संदीपकुमार अपार, एसडीओ,

अचलपूर