शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत गाजला फवारणी यंत्र खरेदीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:01 IST

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा १५ मे रोजी डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विषयाला अनुसरून अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य महेंद्र गैलवार, सुनील डिके, अभिजित बोके, सुहासिनी ढेपे, सीईओ अमोल येडगे, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो दत्तात्रय फिसके आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कमी कि मतीची वस्तू दुपटीने, व्हिडिओ कॉफरन्सव्दारे सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचा लढा सुरू आहे. अशातच जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमार्फत खरेदी केलेल्या फवारणी यंत्राच्या किमतीत मोठी तफावत असल्याचा मुद्दा शुक्रवारी जिल्हा परिषदेत व्हिडीओ कॉफरन्सव्दारे पार पडलेल्या स्थायी समितीत गाजला. दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश झेडपी अध्यक्षांनी दिले आहे.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा १५ मे रोजी डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विषयाला अनुसरून अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य महेंद्र गैलवार, सुनील डिके, अभिजित बोके, सुहासिनी ढेपे, सीईओ अमोल येडगे, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो दत्तात्रय फिसके आदी उपस्थित होते. कार्यालयात उपस्थित खातेप्रमुखांनी पदाधिकारी व सदस्यांच्या प्रश्नाची व्हिसीव्दारे उत्तरे दिली. सध्या कारोनाविषयी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून १० ते १५ हजारांचे फवारणी यंत्र ३० ते ३५ हजार रुपये दराने खरेदी केल्याचा प्रकार निदर्शनास आला. हा मुद्दा अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सीईओंच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान हे सर्व यंत्र खरेदीच्या चौकशीसाठी समिती नेमलेली आहे. या समितीचा चौकशी अहवाल प्राप्त होताच दोषींवर कार्यवाईचा बडगा उगारला जाणार आहे. याशिवाय सभेत रवींद्र मुंदे यांनी सिंचन विहिरींचा प्रस्ताव मंजूर होत नसल्याचा मुद्दा मांडला. यावर अध्यक्षांनी रोहयो विभागाच्या डेप्युटी सीईओ माया वानखडे यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. समुद्धी महामार्गामुळे खराब रस्ते दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. बांधकाम विभागाने २५ कोटी २५ लाखाच्या निधी मागणीचा प्रस्ताव सादर केल्याचे अध्यक्षांच्या प्रश्नावर कार्यकारी अभियंता गावंडे यांनी सांगितले.कापूस खरेदीचा ठराव पारितजिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. यामध्ये एकाच दिवशी केवळ ५० ते ६० वाहनांतील शेतमालाचे मोजमाप करण्यात येत आहे. दर्यापूर तालुक्यात ६ हजारांची नोंदणी झाली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ४०० वाहनांचे मोजमाप केल्याचा मुद्दा सदस्य सुनील डिके यांनी सभेत मांडला. दरम्यान कापूस खरेदीची नोंदणी व खरेदीची मुदत वाढण्याबाबतचा ठराव पारित करून हा ठराव पालकमंत्री, पणन मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रशासनाला दिलेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद