शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

इर्विन चौकात पुन्हा धम्माल गल्ली!

By admin | Updated: May 10, 2015 00:34 IST

आबालवृध्दांच्या मनोरंजनासाठी ‘लोकमत’ ने साकारलेली आगळीवेगळी ‘धम्माल गल्ली’ची संकल्पना ...

या, खेळा, आनंद लुटा : पारंपरिक खेळ, स्पर्धा, अन्य कार्यक्रमांची रंगत अमरावती : आबालवृध्दांच्या मनोरंजनासाठी ‘लोकमत’ ने साकारलेली आगळीवेगळी ‘धम्माल गल्ली’ची संकल्पना रविवार १० मे रोजी पुन्हा एकदा इर्विन चौक ते गर्ल्स हायस्कूलपर्यंतच्या मार्गावर आपण अनुभवता येणार आहे. रविवारी सकाळी ६.३० वाजता आयोजित ‘लोकमत’च्या या आनंदोत्सवात सहकुटुंब सहभागी व्हा. यात अडगळीत लपलेली बासरी शोधून, सायकल, स्केट्सवरचीी धूळ झटकून, आजोबांच्या हाती काठी देऊन बच्चे कंपनीला सामील होता येईल. यावेळी झुम्बा, सायकलिंग, स्केटिंग, आर्चरी, कुस्ती, मल्लखांब, जिम्नास्टिक, दोरीवरच्या उड्या, बॅडमिंटन, कॅरम, चेस, रस्सीखेच, लेझिम, शारीरिक कवायती, गिटार, तबला, भजन, भारूड, पारंपारिक वेषभूषा असे बरेच काही अनुभवता येईल. चला तर मग ‘धम्माल गल्ली’ची धम्माल अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा भेटू या इर्विन चौक ते गर्व्हमेंट गर्ल्स हायस्कूल मार्गावर सकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत. ही आहेत वैशिष्ट्ये‘धम्माल गल्ली’ ही संकल्पनाच मूळात आगळी आहे. हा उपक्रम एखाद्या विशिष्ट वयोगटासाठी अथवा पुरूष किंवा महिलांसाठी विभागलेला नाही. यात आबालवृध्द सहभागी होऊ शकतात. इतकेच नव्हे तर आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शनही करू शकतात. सोबतच येथे सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लांबून आस्वादही घेऊ शकतात. आजी,आजोबा, आई-बाबा, काका-काकू आणि इतर आप्तेष्टांसह मित्र-मैत्रिणी एकत्रितपणे या कार्यक्रमात धम्माल करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक -९९२२४२७७९४, ९९२२४४२०५८