शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लाल्या रोगाचे आक्रमण, शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 00:17 IST

संततधार पाऊस अन् लाल्या रोगाचे कपाशी पिकावर झालेल्या आक्रमणाने तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

शेतकऱ्यांची दैना : पऱ्हाटी सुकली, पाने गळली, उरले फक्त बोंडमनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरसंततधार पाऊस अन् लाल्या रोगाचे कपाशी पिकावर झालेल्या आक्रमणाने तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तालुक्यांतर्गत येत असलेल्या मांजरी म्हसला येथील शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीचे पीक पूर्णत: वाळून गेले असून पान गळली अन् पऱ्हाटीला फक्त बोंडंच शिल्लक राहिल्याने या शेतकऱ्याला दोन लाखांचा फटका बसला आहे. तालुक्यांतर्गत येत असलेल्या मांजरी म्हसला येथील शेतकरी मनदेव चव्हाण प्रतिवर्षी दोन ते तीन एकरांत अडीच ते तीन लाखांचे कापूस उत्पादित करतात. त्यामुळे कापून उत्पदानासाठी लागणाऱ्या ना ना प्रकारचे उपाय ते नित्यनेमाने करतात. त्याचप्रमाणे याही वर्षी त्यांनी निंदण-खुरपणापासून डवरणी, विविध प्रकारच्या खतांचा डोस व कीड नाशक फवारणीचा प्रयोग केला. त्यामुळे पीक वाढीसाठी खर्चसुद्धा बराच झाला. शेतात राबराब राबून हाडाचं काड अन् रक्ताचे पाणी करणाऱ्या या शेतकऱ्याला यावर्षी मात्र कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण अन् संततधार पावसाने दोन लाख रुपयांचा फटका बसला आहे. शेतातील ऐन जोमात असलेले पीक क्षणार्धात हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खर्चही वाया गेला अन् पीकही नष्ट झाल्याने या शेतकऱ्यासमोर फार मोठी आर्थिक विवंचना निर्माण झाली आहे. या शेतकऱ्याजवळ चार एकर शेती असून अडीच एकरांत कपाशी व दीड एकरात सोयाबीन पिकाची पेरणी त्याने केली होती. परंतु सोयाबीनलासुद्धा संततधार पावसाने कोंब फुटू लागल्याने फार मोठ्या आर्थिक समस्येचा डोंगर या शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. आठवडा उलटल्यानंतरही अधिकारी फिरकेनाशेतातील पीक नष्ट झाल्याने अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला. परंतु अद्यापपर्यंत तलाठी, मंडळ अधिकारी यापैकी कुणीच शेतातील पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता न आल्याने प्रशासनाला शेतकऱ्याची दैना दिसत नसल्याची खंत नुकसानग्रस्त शेतकरी मनदेव चव्हाण यांनी बोलून दाखविली.