शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
3
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
4
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
5
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
6
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
7
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
8
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
9
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
10
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
11
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
12
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
13
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
14
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
15
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
17
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
18
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
19
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
20
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील प्रवाशांची मध्यप्रदेशाच्या सीमेवर तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 14:50 IST

Amravati News मध्य प्रदेशच्या सीमेवर तपासणी करण्याचे निर्देश बैतुलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. २४ फेब्रुवारीला त्यांनी हे आदेश काढले आहेत.

ठळक मुद्देबैतुल जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश 

लोकमत न्यूज नेटवर्क 
 

अमरावती : महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची वाढती संख्या बघता, राज्यातील प्रवाशांची, यात्रेकरूंची कोरोनाच्या अनुषंगाने मध्य प्रदेशच्या सीमेवर तपासणी करण्याचे निर्देश बैतुलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. २४ फेब्रुवारीला त्यांनी हे आदेश काढले आहेत.

             परतवाडा-बैतुल मार्गावर बहिरमघाटच्या पुढे मध्यप्रदेश सीमेवरील खोमई बॅरियरवर ही तपासणी केली जात आहे. बहिरमपासून अवघ्या सात किलोमीटरवर ही खोमई बॅरियर आहे. या ठिकाणी परतवाड्याकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाला थांबविले जात आहे. वाहनचालक, परिचरांसह प्रवाशांची माहिती या बॅरियरवर घेतला जात आहे. त्याकरिता तेथे एक पथकही तैनात करण्यात आले आहे. मेडिकल प्रमाणपत्र, थर्मल स्क्रीनिंग, मास्क, फेस कव्हर आणि सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात अनिवार्य केला आहे. कोविडची लक्षणे असलेल्या प्रवाशांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यासह सात दिवस क्वारंटाईन ठेवण्याची तयारीही बैतुल जिल्हाधिकाऱ्यांनी चालविली आहे.

दरम्यान, बहिरम येथील आंतरराज्य आरटीओ चेक पोस्टवरही मध्यप्रदेशमधून येणाऱ्यांची माहिती अधूनमधून घेतली जात आहे. अमरावती आणि अचलपूर येथील कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मध्य प्रदेश शासन व प्रशासन सतर्क झाले आहे. या खोमई चेकपोस्टसह प्रभातपट्टन-वरूड रोडवील गौनापूर बॅरियर आणि मुलताई नागपूर रोडवरील खंबारा टोल नाक्यावर ही तपासणी चालविली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस