शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अमानुष मारहाण... सराट्याचे चटके... तरीही चिमुकलीची आस...

By admin | Updated: November 10, 2014 22:34 IST

मुळात पती-पत्नीचे नातेच विश्वासाचे. पण, तिचे लग्नच खोट्या माहितीवर जुळलेले...तरीही तिने जुळवून घेतले...उद्याच्या सुस्वप्नांची आस घेऊन ती जगत राहिली...दैवाने पदरी एक सुंदर कन्यारत्न घातले..

गणेश वासनिक - अमरावतीमुळात पती-पत्नीचे नातेच विश्वासाचे. पण, तिचे लग्नच खोट्या माहितीवर जुळलेले...तरीही तिने जुळवून घेतले...उद्याच्या सुस्वप्नांची आस घेऊन ती जगत राहिली...दैवाने पदरी एक सुंदर कन्यारत्न घातले...पण तिच्या हाल-अपेष्टा काही संपल्या नाहीत..नशिबी आलेली मारहाण, उपासमार सोसताना अर्धमेली झालेली ती सध्या सासरच्या अत्याचारामुळे इर्विन रूग्णालयात उपचार घेतेय..सासरच्यांनी हिसकावून घेतलेली लाडकी लेक परत मिळवायचीच..या निश्चयासह लढते आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिंगणी (गावंडगाव) या खेडेवजा गावातील दीपमालाची कथा अंगावर शहारे आणणारी आहे. अमरावती शहरातील कमिश्नर कॉलनी येथील पंजाबराव तायवाडे यांची कन्या दीपमाला हिचा विवाह २००९ साली अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिंगणी (गावंडगाव) येथील लव्हाळे कुटंबातील विनोद नामक युवकासोबत झाला. बोलणीदरम्यान मुलाला खासगी आयुर्विमा कंपनीत नोकरी असल्याचे सांगितले गेले. मात्र, लग्नानंतर विनोदला नोकरी नसल्याचे समजले. तरीही दीपमालाने परिस्थितीशी जुळवून घेत संसार सुरू केला. कालांतराने त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले. मात्र, मुलगी झाल्याने दीपमालाच्या सासरच्यांनी तिचा छळ सुरु केला. माहेरहून पैसे आणण्यासाठी दीपमालाचा छळ होऊ लागला. अनेकदा सासरच्यांची पैशांची मागणी दीपमालाने वडिलांना सांगून पूर्णही केली. परंतु तरीही कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन सतत मारहाण, टोचून बोलणे, आई- वडिलांना शिवीगाळ हा प्रकार नित्याचाच झाला होता. तरीही दीपमालाने चिमुकल्या विधिशा नामक चिमुरडीसाठी हे सर्व सहन केले. मात्र, सासरच्या मंडळींनी हळूहळू मानवतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. एक, दोन नव्हे तर चक्क आठ दिवस दीपमाला हिला उपाशी ठेवले. त्यामुळे तिची प्रकृती खालावली. घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी..येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉर्ड क्र. १४ मध्ये उपचार घेणाऱ्या दीपमाला लव्हाळे हिचे पूर्ण लक्ष चार वर्षांच्या चिमुरड्या विधीशाकडे लागले आहे. विधीशा हिला तिच्यापासून दूर करण्यासाठी सासरची मंडळी षडयंत्र रचत असली तरी विधिशाला स्वत:पासून कधीही दूर होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार दीपमालाने केला आहे. मुलीला मिळविण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयाच्या पायऱ्या चढण्याचीदेखील तिची तयारी आहे. पोलीस आयुक्तांकडून न्यायाची अपेक्षासासरच्या लोकांनी आठ दिवस उपाशी ठेवले. सतत मारहाण केली. त्यानंतर वाहनाने माहेरी आणून अक्षरश: फेकून दिले. ही अतिशय गंभीर बाब असतानादेखील आतापर्यंत फ्रेजरपुरा पोलिसांनी दीपमाला हिला अमानुष मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले नाही. पोलीस केवळ कागदी घोडे नाचवित असून तिला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न दीपमाला हिच्या माहेरच्यांनी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांना केला आहे.