शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST

दररोजप्रमाणे वर्ग सुरू झाले. यादरम्यान महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये काही कारणांवरून अजिंक्य व सदर मुलीचा वाद सुरु झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अजिंक्यने तिला थापडा व बुक्क्यांनी मारहाण करणे सुरु केले.

ठळक मुद्देवर्गमित्राचे महाविद्यालय परिसरातील कृत्य : लाथाबुक्क्या मारुन खाली पाडले, काही तास मुलगी बेशुद्ध, पीडीएमसीत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधी महाविद्यालयात एका विद्यार्थिनीला भावी वकील विद्यार्थ्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत तिचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना बुधवारी मोर्शी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये घडली. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अजिंक्य चित्तरंजन सिनकर (२४, रा. यवतमाळ, ह.मु. फरशी स्टॉप) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.पोलीस सूत्रानुसार, विधी महाविद्यालयात शिकणाऱ्या अजिंक्य सिनकरची २२ वर्षीय विद्यार्थिनीसोबत मैत्री होती. बुधवारी महाविद्यालयात विद्यार्थी आले होते. दररोजप्रमाणे वर्ग सुरू झाले. यादरम्यान महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये काही कारणांवरून अजिंक्य व सदर मुलीचा वाद सुरु झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अजिंक्यने तिला थापडा व बुक्क्यांनी मारहाण करणे सुरु केले. या प्रकाराकडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले गेले. मारहाणीनंतर अजिंक्य तेथून निघून गेला. जमिनीवर कोसळलेल्या त्या विद्यार्थिनीला अन्य विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला. या घटनेची माहिती प्राचार्य व प्राध्यापकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कॅम्पसकडे धाव घेतली. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणय मालवीय व स्त्री हिंसाचार प्रतिबंधक समितीच्या अध्यक्ष भाग्यश्री देशपांडे यांनी त्या विद्यार्थिनीला तात्काळ डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता नेले. घटनेची माहिती झाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात विद्यार्थिनीचे बयाण नोंदविले. त्यावरून अजिंक्यविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ३५४, ३२३ अन्वये गुन्हा नोंदविला.वचक नाही; विद्यार्थी असुरक्षितश्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान दिले जाते. या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी वकील तसेच नामांकित न्यायाधीशसुद्धा झाले आहेत. तथापि प्राध्यापकांचा आता विद्यार्थ्यांवर वचक नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वीही महाविद्यालय परिसरात मारामारीच्या आणि शस्त्र उगारण्याच्या घटना घडल्या आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची मान खाली जावी, अशी बुधवारची घटना आहे.मुलीचे बयाण नोंदविण्यात आले. त्यानुसार आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध विनयभंग व मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.- यशवंत सोळंकेपोलीस उपायुक्तजखमी मुलीला उपचारासाठी पीडीएमसीत दाखल केले आहे. पोलिसांनी बयाण नोंदविले व कारवाई केली. समितीच्या चौकशीनंतर महाविद्यालय प्रशासनाकडून पुढील कारवाई होईल.- प्रणय मालवीय,प्राचार्य

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय